आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूड:अभिनेत्री स्वरा भास्करच्या आई आणि कुकला कोरोनाचा संसर्ग, 'टार्जन' फेम वत्सल सेठलाही झाली लागण

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.

देशात पसरलेल्या कोरोनाच्या दुसरी लाटेत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. सामान्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सोमवारी अभिनेत्री स्वरा भास्करची आई इरा भास्कर आणि त्यांच्या घरातील कुकला कोरोनाचा संसर्ग झाला. तर दुसरीकडेच टार्जन या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या वत्सल सेठचाही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

स्वराने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन आपल्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये स्वरा म्हणाली, 'तो आता घरात आलाय. माझी आई आणि माझा स्वयंपाकी दोघेही कोरोनाबाधित आढळले आहेत. आम्ही स्वतःला आमच्या दिल्लीमधल्या घरात विलग करुन घेतले आहे.' यासोबतच स्वराने आपल्या चाहत्यांना मास्क घालण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहनही केले आहे.

वत्सलने लिहिले- आम्हीही पॉझिटिव्ह झालो 'टार्जन' फेम अभिनेता वत्सल सेठनेही त्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तो घरातच क्वरांटाइन आहे.

वत्सलशिवाय आशुतोष राणा, परिधी शर्मा, समीरा रेड्डी हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. समीराचा नवरा आणि मुलांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याची माहिती समीराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली आहे,. तर 'शक्तीमान' फेम मुकेश खन्ना यांचे थोरले भाऊ सतीश खन्ना यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...