आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी यावर्षी 6 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी दोघांनी साखरपुडा करत लग्न केल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. कोर्ट मॅरेजनंतर धुमधडाक्यातही लग्न करणार असल्याचे दोघांनी एक व्हिडिओ शेअर करत सांगितले होते. ठरवल्यानुसार नुकताच दोघांचा धुमधडाक्यात त्यांचा मेंदी, हळद आणि संगीत सोहळा पार पडला. मात्र या सर्व समारंभानंतर दोघांनी लग्नच केले नाही, अशी माहिती आहे.
हे आहे पारंपरिक पद्धतीने लग्न न करण्यामागील कारण
स्वराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचा ब्रायडल लूक शेअर केला आहे. स्वराने लग्नात लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती. साडीवर स्वराने साऊथची टेंपल ज्वेलरी परिधान केली आहे. पण या दोघांनी लग्न केले नसल्याची माहिती समोर आली आहे. स्वराने लग्नाच्या विधीचे फोटो टाकलेले नाहीत, त्यामुळे स्वरा आणि फहादने हिंदू किंवा मुस्लीम कोणत्याही पद्धतीने लग्न केलेले नाही, अशा चर्चा आहेत. ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, "स्वरा आणि फहादने कोणत्याही विशिष्ट पद्धतीने लग्न केले नाही. दोघांनी हळदी, मेंदी, संगीत आणि रिसेप्शन यांसारखे फंक्शन्स आयोजित केले होते. त्यांचा हिंदू विवाह किंवा मुस्लीम पद्धतीने निकाह होणार नाही."
कर्नाटकात पार पडले लग्नविधी
स्वरा आणि फहाद अहमद यांचा हा विवाहसोहळा कर्नाटकात धुमधडाक्यात पार पडला. या लग्नसोहळ्यातील स्वराचा लूक देखील सध्या चर्चेचा विषय ठरतोय. स्वरा दिल्लीची असल्याने हा सोहळा खरं तर दिल्लीतच होईल असे म्हटले जात होते. परंतु स्वरा आणि फहाद अहमद यांनी कर्नाटकला पसंती दिली. त्यामुळे स्वराच्या लूकमध्येही साऊथचा टच दिसून येतोय. स्वराच्या हातावर मेंदी, लाल बांगड्या, नाकात नथ, माथापट्टी आणि केसांत गजरा दिसतोय. स्वरा तेलुगू नवरीप्रमाणे सजली होती.
एवढी आहे स्वराच्या साडीची किंमत
स्वराने लग्नात नेसलेली लाल रंगाची बनारसी साडी रॉ मॅंगो या लोकप्रिय ब्रॅन्डची आहे. ही साडी कौरवी सिल्क बनारसी ब्रोकेड या प्रकारात मोडते. या साडीची किंमत लाखाच्या जवळपास जाणारी आहे. स्वराच्या लग्नाच्या साडीची किंमत तबब्बल 94,800 रुपये इतकी असल्याचे म्हटले जात आहे.
वीणा नागदा यांनी काढली स्वराच्या हातावर मेंदी
स्वरा भास्करने मेंदीसाठी प्रसिद्ध मेंदी आर्टिस्ट वीणा नागदा यांची निवड केली होती. वीणा यांनी स्वराच्या हातावर लग्नाची सुंदर मेंदी काढली. वीणा या मेंदीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची पहिली पसंती असतात. त्यांनी आतापर्यंत अनेक अभिनेत्रींच्या हातावर मेंदी काढली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.