आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडमध्ये घमासान:स्वरा भास्करने केला पलटवार, म्हणाली - जर कंगनाला सुशांतसाठी न्याय मागायचा असता तर तिने याला पर्सनल अजेंडा बनवले नसते

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 जून 2020 रोजी सुशांतसिंग राजपूतच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली. त्याच्या निधनानंतर कंगना रानोट शांत बसली नाही आणि नेपोटिज्मपासून तर फेव्हरटिज्म आणि कँपबाजीला सुशांतच्या मृत्यूला जबाबदार धरले. कंगनाने अनेक अवॉर्ड शोमध्ये सुशांतच्या छिछोरे चित्रपटाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही लावला.

यानंतर कित्येक माध्यमांच्या मुलाखतींमध्ये कंगनाने तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना लक्ष्य केले. तिने तापसी, स्वराला बी-ग्रेड अभिनेत्री म्हणत त्यांच्यावर राग काढला कारण त्या नेपोटिज्म विरुद्ध तिची साथ देत नाही. 

कंगनाच्या अशा वागण्यानंतर तापसी आणि स्वराने सोशल मीडियावर उघडपणे तिला उत्तर दिली आहेत. नुकतेच पिंकविलाच्या एका मुलाखतीत स्वराने कंगनाच्या या व्यवहाराविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. 

स्वराने केला पलटवार 
स्वरा म्हणाले - कंगनाने कलीग्सला चापलूस, गरजू आउटसाइडर, बी-ग्रेड अभिनेत्री म्हटले. जर कंगना सुशांतसाठी न्याय मागत असती तर तिने संपूर्ण डिबेटमध्ये तिचा मुद्दा भटकू दिला नसता. तिने संपूर्ण मुद्दा स्वतःवर केंद्रीत केला. याला आपला पर्सनल अजेंडा बनवले. तिने दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा सुशांतचे काम सेलिब्रेट करायला हवे होते.

दरम्यान या मुलाखतीत स्वराने कंगनाची प्रशंसाही केली आहे. तिच्या कामाचे कौतुक केले आहे. कंगना टॅलेंटेड अभिनेत्री आणि चांगली परफॉर्मर असल्याचेही स्वरा म्हणाली. तसेच तनु वेड्स मनु आणि क्वीनमधील तिच्या कामाची प्रशंसा केली. स्वरा पुढे म्हणाले की, ती मनात कुणाविषयी पर्सनली वाईट गोष्टी ठेवत नाही. 

कंगनाच्या कोणत्या गोष्टींमुळे सुरू झाला वाद 
कंगनाने अर्णब गोस्वामीला दिलेल्या मुलाखतीत तापसी आणि स्वाराचे बी-ग्रेड अभिनेत्री म्हणून वर्णन केले होते. ती म्हणाली होती की - माझे येथे राहून नुकसानच आहे. कारण त्यांना उद्या तापसी पन्नू आणि स्वरा भास्करसारख्या 20 गरजू आउटसाइडर मिळतील, तर म्हणतील की, केवळ कंगनालाच नेपोटिज्मची अडचण आहे. पण आम्ही करण जोहरवर प्रेम करतो. 

पण जर तुम्ही करण जोहरवर प्रेम करता तर मग दोघीही बी-ग्रेड अॅक्ट्रेस का आहात? तुम्ही आलिया भट आणि अनन्या पांडेपेक्षा चांगल्या दिसता. तुम्ही खूप चांगल्या अभिनेत्री आहात. तुम्हाला काम का मिळत नाही? तुमची पूर्ण उपस्थिती नेपोटिज्मचा पुरावा आहे.