आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकली. समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी स्वराने लग्न केले. दोघांनी रजिस्टर्ड मॅरेज केले असून आता धुमधडाक्यातही दोघे लग्न करणार आहेत. दरम्यान स्वराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मधुचंद्राच्या रात्रीच्या दिवशी बेडरूममधील सजावटीचा एक फोटो शेअर केला होता. आता तिच्या अकाउंटवरुन हा फोटो डिलीट करण्यात आला असला तरी सोशल मिडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये स्वराने तिच्या बेडरूममध्ये फुलांनी सजवलेला बेड आपल्याला दिसत आहे, याबरोबरच तिने तिच्या आईसाठी या फोटोमध्ये खास मेसेज दिला आहे. या फोटोबरोबर स्वराने लिहेल, "माझी मधुचंद्राची रात्र एकदम फिल्मी असावी यासाठी आईने पूर्ण तयारी केली आहे." स्वराच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्री तिची बेडरूम सजवण्याची जबाबदारी होम डेकोर स्टाइलिस्ट प्रियांका यादवकडे देण्यात आली होती. प्रियांकानेसुद्धा स्वराने शेअर केलेला हा फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला होता.
6 जानेवारी रोजी झाले लग्न
स्वराने फहाद अहमदशी 6 जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केले. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी दोघांनी साखरपुडा केला. विशेष म्हणजे नोंदणी पद्धतीने लग्न आणि साखरपुडा केल्यानंतर स्वरा आणि फहाद धुमधडाक्यातही लग्न करणार आहेत.
अशी सुरु झाली दोघांची प्रेमकहाणी
स्वरा आणि फहादची पहिली भेट डिसेंबर 2019 मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तीन वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फहाद एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याने सीएएविरोधी आंदोलनात सहभागी झाला होता. तो समाजवादी पार्टीची युवा संघटनेचा मुंबई आणि महाराष्ट्र भागातील अध्यक्ष आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे स्वरा भास्कर
34 वर्षीय स्वरा भास्करने 2010 मध्ये 'गुजारिश' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2011 मध्ये आलेल्या 'तनु वेड्स मनू' या चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली. मिरांडा हाऊस, दिल्ली येथून ती पदवीधर आहे. तिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. स्वरा भास्कर शेवटची 'जहां चार यार' या चित्रपटात दिसली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.