आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वराचा विक्रम गोखलेंवर निशाणा:'पद्म पुरस्कार येत आहे...' मोजक्या शब्दांत स्वरा भास्करने विक्रम गोखलेंना लगावला टोला

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वरा भास्करने विक्रम गोखले यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

अभिनेत्री कंगना रनोटने काही दिवसांपूर्वी 1947 चे स्वातंत्र्य हे भीक मागून मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून तिच्यावर टीका होतेय. मात्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगना रनोट जे बोलली ते खरंच आहे, असे म्हणत तिचे समर्थन केले. यानंतर अनेकांनी विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील विक्रम गोखले यांच्यावर अत्यंत मोजक्या शब्दांत निशाणा साधला आहे.

75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा रविवारी सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखले यांनी हे विधान केले होते. यावेळी त्यांनी मोदींचे कौतुक करत शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरे होईल असे मतही व्यक्त केले. विक्रम गोखले यांचा हा व्हिडिओ शेअर करत स्वरा भास्करने विक्रम गोखले यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. 'पद्म पुरस्कार येत आहे,' असं स्वरा भास्कर म्हणाली आहे.

काय म्हणाले होते विक्रम गोखले ?
स्वातंत्र्यासंबंधी कंगना रनोटच्या वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले. विक्रम गोखले म्हणाले की, कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवले नाही. अनेकजण बघत राहिले असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी यावेळी केला. सोबतच देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना विक्रम गोखले म्हणाले की, राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे. बाबरापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाहीत, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.

देश कधीही हिरवा होणार नाही
लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे. असं वक्तव्य गोखले यांनी केलं. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरे होईल, असेही ते म्हणाले.

महागाई काय मोदींनी वाढवली आहे का?
महागाई काय मोदींनी वाढवली आहे का? असा सवाल करून ते म्हणाले की, जे लोक पक्षाचे काम करतात त्याबद्दल मी त्यांना काही बोलत नाही. पक्षाचे काम सगळेच करतात. मोदी जेव्हा पक्षासाठी काम करतात तेव्हा मी त्यांच्या बाजूने उभा राहत नाही, पण मोदी जेव्हा देशासाठी उभे राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात. एका बॅरेलची किती किंमत झाली आहे तुम्हाला माहिती आहे का ? हॉटेलमध्ये एका वेळी तुम्ही 10 हजार रुपये खर्च करू शकता, पण एक व्यक्ती देशात गेल्या 70 वर्षांपासून जी घाण साचली आहे ती साफ करत आहे, त्याला काही काळ का होईना मदत करता येत नाही?

बातम्या आणखी आहेत...