आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने तिचा आगामी चित्रपट 'शिबपूर'चा सहनिर्माता संदीप सरकारवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. एका मुलाखतीदरम्यान स्वस्तिकाने दावा केला की, संदीप आणि त्याच्या साथीदारांनी तिला काही ईमेल पाठवले असून त्यात तिचे मॉर्फ केलेले नग्न फोटो आहेत. हे फोटो अश्लील वेबसाइटवर लीक करण्याची धमकी त्यांच्याकडून देण्यात आल्याचे स्वस्तिकाने सांगितले आहे.
याप्रकरणी स्वस्तिकाने गोल्फ ग्रीन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिने ईस्टर्न इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनशीही संपर्क साधला आणि त्यांना या धमकीच्या ईमेलच्या स्कॅन केलेल्या प्रती पाठवल्या आहेत. स्वस्तिकाने सांगितले की, हा चित्रपट विना वादाचा प्रदर्शित व्हावा यासाठी तिला याबद्दल कधीही जाहीरपणे वक्तव्य करायचे नव्हते.
शूटिंग-डबिंगदरम्यान मी संदीपला भेटले नाही
'ओटीटी प्ले'ला दिलेल्या मुलाखतीत होणाऱ्या छळाविषयी बोलताना स्वस्तिकाने सांगितले- 'हे सर्व खूप विचित्रपणे सुरू झाले. शूटिंग आणि डबिंग दरम्यान मी संदीप सरकारला कधीही भेटले नाही. चित्रपटाच्या दुसऱ्या सहनिर्मात्या अजंता सिन्हा रॉय यांच्यासोबत चित्रपटाविषयी माझे कायम बोलणे व्हायचे. अचानक संदीप सरकार मला धमकीचे ईमेल पाठवू लागला. त्याने केलेल्या दाव्यानुसार, तो एक अमेरिकन नागरिक असून जर मी त्याचे ऐकले नाही तर तो मला अमेरिकेचा व्हिसा मिळू नये म्हणून अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधेल.'
स्वस्तिकाला मिळाल्या धमक्या
स्वस्तिका पुढे म्हणाली, 'त्याने मला पोलिस आयुक्त, मुख्यमंत्र्यांची भीती दाखवली. त्यावेळी तो माझ्याकडे काय मागतोय याची मला अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे मी चित्रपटाचे शूटिंग केले आणि डबिंग पूर्ण केले. चित्रपटाच्या प्रमोशनल अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्याचा माझा कधीच हेतू नव्हता,' असे तिने सांगितले.
रिलीजची तारीख बदलली, निर्मात्यांनी मला कळवले नाही
स्वस्तिका म्हणाली- 'पूर्वी हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता, म्हणून मी त्यांना माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माझ्या तारखा ईमेल केल्या. पण मला याबाबत काहीच उत्तर मिळाले नाही. अचानक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही बदलली, पण निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही पुर्वकल्पना देण्यात आली नाही. मला आमच्या दिग्दर्शकाकडून याबद्दल माहिती मिळाली, त्यानंतर मी त्यांना माझ्या नवीन तारखा पुन्हा ईमेल केल्या. पण असे असूनही मला मार्केटिंग किंवा पीआरच्या बाजूने कोणताही प्लान मिळाला नाही.'
स्वस्तिकाच्या मॅनेजरला धमकीचे मेल आले होते
स्वस्तिका व्यतिरिक्त तिच्या मॅनेजरला रवीश शर्मा नावाच्या व्यक्तीकडून धमकीचा ईमेल आला होता. मेलमध्ये रवीशने स्वत:ची ओळख संदीप सरकारचा मित्र म्हणून करून दिली आणि दावा केला की, तो एक उत्तम हॅकर आहे. त्या व्यक्तीने स्वस्तिकाला धमकी दिली की, तो तिचा फोटो मॉर्फ करून वेगवेगळ्या पोर्नोग्राफी साइटवर अपलोड करेल. स्वस्तिकाने दावा केला की, त्या व्यक्तीने तिला 2 मॉर्फ फोटो पाठवले आहेत, जे पूर्णपणे न्यूड आहेत.
स्वस्तिकाने सांगितल्यानुसार, हा चित्रपट सहजरित्या प्रदर्शित व्हावा म्हणून तिने याबाबत कोणतेही पाऊल जाहीरपणे उचलले नाही. पण या प्रकरणाने इतके वाईट वळण घेतले की, तिच्याकडे पर्यायच उरला नाही. त्यामुळेच तिने मीडियासमोर येऊन ही गोष्ट उघड केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.