आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अचिव्हमेंट:तापसी पन्नूची गगनभरारी, ठरली वर्षभरातील सर्वात यशस्वी अभिनेत्री; आश्चर्यचकित होऊन म्हणाली - 'असे काही घडले असेल, हे कळलेच नाही'

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री तापसी पन्नूने बॉक्स ऑफिसवर गेल्या वर्षभरातील सर्वात यशस्वी अभिनेत्रीचा मान पटकावला आहे. गेल्या 12 महिन्यांत तिचे एकुण पाच चित्रपट रिलीज झालेत. विशेष म्हणजे एका सर्व चित्रपटांनी मिळून एकुण 350 कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय केला आहे. विशेष म्हणजे तापसीला यापासून अनभिज्ञ होती. तिने सोशल मीडियावर ट्विट करुन आश्चर्य व्यक्त केले. 

तापसीने एका ट्विटमध्ये लिहिले आहे, "अरे छान. असे काही घडले असेल, हे कळलेच नाही. मला असे वाटते की, क्वारंटाईनमधील हा क्षण इथेच थांबवून मागे वळून पहावे आणि आतापर्यंतचा प्रवास साजरा करावा. धन्यवाद."

  • दीया मिर्झाने केले अभिनंदन

यावर्षी रिलीज झालेल्या 'थप्पड' या चित्रपटात तापसीसोबत काम करणारी अभिनेत्री दीया मिर्झा हिने तिचे अभिनंदन केले आहे. ट्विटरवर तापसीचा उल्लेख करताना दीयाने लिहिले की, "आपण अभिनंदनास पात्र आहात लॉयनेस. आपल्यावर आणि आपल्या निवडीबद्दल अभिमान आहे."

  • 2019 मध्ये 5 पैकी 4 चित्रपट रिलीज झाले

गेल्या 12 महिन्यांत तापसीचे 5 चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकले.  'बदला', 'गेम ओव्हर', 'मिशन मंगल', 'सांड की आँख' आणि 'थप्पड' हे तिचे प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत. यातील सुरुवातीचे चार चित्रपट 2019 मध्ये आले होते, तर थप्पड यावर्षी प्रदर्शित झाला होता. 'गेम ओव्हर' हा एक चित्रपट वगळता अन्य चार चित्रपटांचे समीक्षकांकडून खूप कौतुक झाले.

  • बॉक्स ऑफिसवरील पाच चित्रपटांचे कलेक्शन
चित्रपटरिलीज डेटबॉक्स ऑफिस कलेक्शन
बदला 8 मार्च 201988 कोटी रुपये
गेम ओव्हर14 जून 20194.69 कोटी रुपये
मिशन मंगल15 ऑगस्ट 2019202.98 कोटी रुपये 
सांड की आँख25 ऑक्टोबर 201923.40 कोटी रुपये
थप्पड28 फेब्रुवारी 202033.06 कोटी रुपये 
एकूण कलेक्शन352.13 कोटी रुपये

32 वर्षीय तापसीने 2010 मध्ये तेलुगू चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. 2013 मध्ये 'चश्मे बहाद्दूर' या सुपरहिट चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. यानंतर, ती 'बेबी', 'पिंक', 'जुडवा 2' आणि 'मुल्क' या चित्रपटांमध्ये दिसली आहे.  आगामी काळात तापसीचे 'रश्मी रॉकेट', 'हसीन दिलरुबा', 'शाब्बाश मिठू', 'लूप लपेटा' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...