आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नूने नुकत्याच एका मुलाखतीत 1984 मध्ये शीख समुदायाच्या विरोधात झालेल्या दंगलीचा एक थरारक किस्सा सांगितला. तिने सांगितल्यानुसार, जेव्हा ही दंगल झाली होती, तेव्हा तिचा जन्म झाला नव्हता. या दंगलीमध्ये तापसीच्या कुटुंबियांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले होते.
तापसीच्या आईने तिला सांगितल्यानुसार, त्यावेळी त्यांच्या घराला चारही बाजूंनी दंगलखोरांनी घेरले होते. दंगलखोरांकडे तलवारी आणि पेट्रोल बॉम्ब होते. तेथे एक शीख कुटुंब राहत असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. तापसीच्या म्हणण्यानुसार, तिच्या वडिलांना काही हिंदू कुटुंबांनी वाचवले होते. दंगलखोरांनी त्यांच्या घराबाहेर उभी असलेली कार जाळली होती.
वडिलांचे एकमेव शीख कुटुंब होते
दंगलीचा भयानक किस्सा सांगताना तापसी म्हणाली, "त्यावेळ माझ्या आई-वडिलांचे लग्न झाले नव्हते. माझी आई दिल्लीतील पूर्व भागात राहत होती. तर माझे वडील शक्ती नगर येथे वास्तव्यास होते. 1984 च्या दंगलीबाबत मला काहीही माहीत नाही. माझ्या आई-वडिलांनी जेवढे सांगितले तेवढेच माझ्या लक्षात आहे."
"माझी आई राहत होती तिथे कोणताच धोका नव्हता. परंतु शक्ती नगरमध्ये शीख कुटुंब असलेले फक्त वडिलांचे घर होते आणि लोकांना हे माहित होते. घराबाहेर नेहमी आमची जोंगा गाडी उभी असायची. दंगल करणारे लोक तलवार आणि पेट्रोल बॉम्ब घेऊन घराजवळ आले. त्यांना बघताच घरातील सगळ्या लाईट्स बंद करण्यात आल्या. घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्नच करू शकत नव्हते. कारण घराबाहेर दंगल करणाऱ्या लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे कुटुंबीय घरातच लपले होते."
घराबाहेर आले होते दंगलखोर
पुढे तापसी म्हणाली, "वडील राहत होते त्या इमारतीत चार कुटुंबीय राहत होते. त्यातील आमचेच कुटुंब शीख होते. बाकी तीन हिंदू होते. दंगल करणारे लोक गेटजवळ येताच त्यांनी आमच्या कुटुंबियांबाबत हिंदू कुटुंबियांना विचारले. आम्ही पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दंगल करणाऱ्यांनी घराबाहेर असलेली जोंगा गाडी जाळून टाकली. इमारतीतील इतर लोकांमुळेच तेव्हा माझ्या कुटुंबियांचा जीव वाचला," असे तापसीने सांगितले.
शीख दंगल का झाली होती?
31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दोन शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती, ज्यामुळे देशाच्या अनेक भागात शीखविरोधी दंगली उसळल्या. दिल्लीतील त्रिलोकपुरी, सुलतानपुरी, मंगोलपुरी, कल्याणपुरी, शाहदरा, गीता कॉलनी आणि पालम येथे हत्याकांड घडले. अधिकृत आकडेवारीनुसार, या दंगलीत सुमारे 2800 शीख मारले गेले, तसेच इतर काही धर्माचे लोकही मारले गेले.
शाहरुखच्या 'डंकी'मध्ये दिसणार आहे तापसी
तापसी पन्नू बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘बेबी’, ‘पिंक’, ‘रनिंग शादी’, ‘दिल जुंगली’ आणि ‘जुडवा 2’ यांसारख्या चित्रपटांतून तापसीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच ती 'ब्लर' या थ्रिलर चित्रपटात दिसली होती. याशिवाय ती अनुराग कश्यपच्या 'दोबारा' या चित्रपटातही दिसली होती. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर ती शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटात दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.