आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज प्रकरण:आर्यन खान प्रकरणावर तापसी पन्नू म्हणाली - स्टार कुटुंबातील असल्याचे काही फायदे तर काही तोटेदेखील आहेत

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पब्लिक फिगर असल्याचे काही फायदे तर काही तोटे आहेत

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानची रवानगी आता आर्थर रोड तुरुंगात झाली आहे. किल्ला कोर्टाने शुक्रवारी आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर आता त्याचे वकील सतीश मानेशिंदे सत्र न्यायालयात जामिनासाठी अपील करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, आर्यन आणि अरबाज मर्चंटने एनसीबीच्या चौकशीदरम्यान ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खानच्या या प्रकरणावर अभिनेत्री तापसी पन्नूची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिने म्हटले की, स्टार किड असण्याचे काही फायदे आहेत, तर काही तोटे देखील आहेत.

पब्लिक फिगर असल्याचे काही फायदे तर काही तोटे आहेत
तापसीने अलीकडेच एका मुलाखतीत या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले. ती म्हणाली, 'प्रसिद्धीबरोबर त्या गोष्टीची जबाबदारी देखील येते. एक पब्लिक फिगर म्हणून त्याचे काही फायदे आहेत, तर काही तोटेदेखील हे आहेतच. आणि हे फायदे आणि तोटे केवळ पब्लिक फिगरपर्यंतच मर्यादीत राहात नाहीत. तर कुटुंबालादेखील त्याचा सामना करावा लागतो. स्टारडमचे जर तुम्ही फायदे उपभोगत असाल, तर त्याचे दुष्परिणाम देखील असतील याची काळजी घेतली पाहिजे.'

घडणाऱ्या गोष्टींचे परिणाम काय होणार याची पूर्ण कल्पना असेलच
तापसी पन्नू म्हणाली, 'या प्रकारचे स्टारडम मिळाल्यानंतर तुम्हाला जाणीव असते की कशा प्रकारे आणि कसा तपास होणार… असं नाही की कुठून हे आले कळालेच नाही. मला वाटते त्यांना घडणाऱ्या गोष्टींचे परिणाम काय होणार याची पूर्ण कल्पना असेलचं. तसेच तुम्ही कायदेशीर प्रक्रियेतून जाण्यासाठीसुद्धा तयार राहिले पाहिजे.”

क्वारंटाईन सेलमध्ये आहे आर्यन
आर्यनला आर्थर रोड जेलमधील क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी न्यायालयात दोन जामीन अर्ज दिले आहेत. दोघांपैकी एक अंतरिम जामिनासाठीची
याचिका आहे जेणेकरून आर्यनला तत्काळ जामीन मिळावा आणि दुसरा नियमित जामिनासाठी आहे म्हणजे जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत असेल तोपर्यंत त्याला जामिनावर राहता यावे. दुसरीकडे, एनसीबीने एनडीपीसी कायद्यांतर्गत नियमित जामिनाला आधीच विरोध केला आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने 24 तास चाललेल्या सुनावणीनंतर गुरुवारी आर्यनसह सर्व 8 आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते.

बातम्या आणखी आहेत...