आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संतापजनक:तापसी पन्नू, रेणुका शहाणे यांच्यासह अनेक सेलेब्रिटींना वाढीव वीज बिलाची झळ, सौम्या टंडन म्हणाली - कदाचित लॉकडाऊन सरचार्जही जोडला 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलाकारांनी आपला संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

लॉकडाऊननंतर केवळ सामान्य जनताच नव्हे तर छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील अनेक कलाकारांना अव्वाच्या सवा दराने वीज बिल येत आहे. तापसी पन्नू, रेणुका शहाणे, सौम्या टंडन, नेहा धुपिया, दिनो मोरिया आणि पुलकित सम्राट या सेलेब्रिटींनी वाढीव वीज बिलाची झळ बसली आहे. त्यांनी आपला संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

  • तापसीच्या घरी आले एकुण 36 हजारांचे वीज बिल 

अभिनेत्री तापसी पन्नूला तब्बल 36 हजारांचे वीज बिल आहे. रविवारी आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिले की, ''लॉकडाऊनचे तीन महिने आणि कोणती नवी उपकरणं मी वापरली आहेत किंवा नव्याने विकत आणली आहेत ज्यामुळे मला इतकं वीजबिल आलं आहे. नेमकं कोणत्या वीजेचं शुल्क आकारत आहात?” 

तापसीने आपल्या ट्विटमध्ये आधीच्या महिन्यांच्या वीज बिलाचे फोटोही जोडले आहेत. एप्रिल महिन्यात तापसीला 4390 तर मे महिन्यात 3850 रुपये बिल आले होते. इतकंच नाही तर तापसीने आपण राहत नसलेल्या घरासाठीही भरमसाट वीज बिल आले असल्याचे सांगितले आहे.

  • रेणुका शहाणे यांच्या घराचे वीज बिल 18 हजार रुपये

रेणुका शहाणे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून अचानक बिलामध्ये इतकी वाढ कशी झाली असा प्रश्न देखील विचारला आहे. त्यांनी लिहिले की, . ‘मे महिन्यात माझे लाईट बिल 5510 रुपये होते. त्यानंतर जून महिन्याच 29,700 रुपये आले. या महिन्याच्या बिलामध्ये मे आणि जूनचे एकत्र बिल देण्यात आले आहे. तुम्ही मे महिन्याचे बिल 18080 रुपये दाखवले आहे. पण माझे बिल 5510 रुपयांवरुन 18080 रुपये कसे झाले?’ असे त्यांनी प्रश्न विचारला आहे.

  • सौम्या टंडनच्या घराचे वीज बिल 8 हजारांहून 28 हजारांवर गेले

तापसीच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सौम्या म्हणाल्या की, 'माझे बिल 8 हजार रुपयांवरून 28 हजार रुपयांवर गेले आहे. त्यांनी देखील लॉकडाऊन अधिभार जोडला आहे असे दिसते.'

पुलकित सम्राटच्या घराचे वीज बिल 30 हजार रुपये<

वीर दासने विचारले- मुंबईत कुणाचे बिल तिप्पट वाढले आहे का?

डिनो मोरिया म्हणाला, बिल पाहून धक्का बसला.

नेहा धुपिया

बातम्या आणखी आहेत...