आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'रश्मि रॉकेट' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. याशिवाय तिच्या हातात 'हसीन दिलरुबा' आणि 'लूप लपेटा' हे दोन प्रोजेक्ट आहेत. दरम्यान एका मुलाखतीत तापसीने करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला आलेले विचित्र अनुभव सांगितले आहेत. कधी तिला हीरोच्या तुलनेत कमी मानधन देण्यात आले तर कधी तिला बॅड लक चार्म म्हटले गेले. कधी ऐनवेळी चित्रपटातील तिचे संवाद बदलण्यात आले, असे एक ना अनेक वाईट अनुभव तापसीला करिअरच्या सुरुवातीच्या काळात आले आहेत.
तापसीने सांगितली आपबीती
फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली, ""मला बर्याच विचित्र गोष्टींना सामोरे जावे लागले आहे. हिरोच्या पत्नीला मी खटकत होते, तिला मी चित्रपटात नको होते, म्हणून मला एका चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. इतकेच नाही तर मी एका चित्रपटासाठी डबिंग करत होते. त्यावेळी हिरोला माझा डायलॉग आवडला नाही म्हणून मला डायलॉग बदलायला सांगितला. मी जेव्हा नकार दिला, तेव्हा त्यांनी मला कुठलीही कल्पना न देता डबिंग आर्टिस्टकडून हे काम करुन घेतले'', असा खुलासा तापसीने केला.
तापसी म्हणाली - पाठीमागे काय होत असेल ते मला माहित नाही
तापसी पुढे म्हणाली, "असाही एक काळ होता, जेव्हा हीरोचा आधीच चित्रपट चालला नाही म्हणून बजेट कंट्रोलच्या नावाखाली मला मानधनात कपात करायला सांगण्यात आले. हे सर्व माझ्या डोळ्यांदेखत माझ्यासोबत घडले. माझ्या पाठीमागे काय व्हायचे ते मला माहित नाही."
आता ज्यात आनंद मिळतो तेच चित्रपट करते
आपल्या चित्रपट निवडीबद्दल तापसी म्हणाली, "आता मी ज्या चित्रपटांमध्ये काम करण्यापासून मला आनंद मिळतो, तेच चित्रपट मी करते. जेव्हा एखादी मुलगी महिला प्रधान चित्रपट करते, तेव्हा तिच्यावर शिक्का बसतो. त्यानंतर स्टार पुरुष अभिनेते अशा अभिनेत्रीला प्रमुख भूमिकेमध्ये स्थान द्यायला संकोच करतात. हा थोडा कठीण, दीर्घ पल्ल्याचा प्रवास असेल पण प्रत्येक दिवशी मी त्याचा आनंद घेते'', असे तापसीने सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.