आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री तापसी पन्नू स्टारर स्पोर्ट्स ड्रामा 'रश्मि रॉकेट'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित करण्यात आला. आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे. आकर्ष खुराना दिग्दर्शित हा चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
2 मिनिटे 50 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये कच्छमधील एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. तिच्याकडे धावण्याची एक अविश्वसनीय अशी शक्ती आहे. यामध्ये 'रश्मि रॉकेट'ला आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची आणि व्यावसायिक रूपाने स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळते मात्र, तिला हेही जाणवते की फिनिश लाइन आणि धावणे यामध्ये अनेक संकटे आहेत. अखेरीस ही एथलेटिक स्पर्धा सन्मान आणि तिच्या व्यक्तिगत लढाईत रूपांतरित होते.
चित्रपटाच्या शीर्षकाला न्याय देत 'रश्मि रॉकेट'चा ट्रेलर नायिका आणि तिच्या रश्मि रॉकेट बनण्याच्या यात्रेची प्रेरक कहाणी दाखवते. दमदार संवाद, भावना आणि तापसीचे अभिनय कौशल्य यासोबत पुरेपूर नाट्य असलेला चित्रपट आहे. तापसीला हातांमध्ये भारताचा झेंडा धरलेला पाहणे हा एक अविस्मरणीय क्षण आहे, जो निश्चितपणे आपल्याला रोमांचित करतो.
चित्रपटाचे दिग्दर्शक आकर्ष खुराना सांगतात, "जेव्हा प्रांजल आणि तापसी माझ्याकडे नंदा यांच्या या कथेची कल्पना घेऊन आले, तेव्हा मी चकित झालो कारण हा एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये खूप काही आहे, ही एक अनिवार्यपणे मानवीय भावनेच्या विजयाबद्दल आहे. ती भावनात्मक आणि मनोरंजक असून देखील काही गंभीर मुद्द्यांना स्पर्श करण्याची संधी दिली. मी हा चित्रपट करण्यासाठी थांबूच शकत नव्हतो आणि आता तो लोकांसमोर आणण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीये."
चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टी
'रश्मि रॉकेट' या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या वर्षी सुरु झाले होते. पुणे आणि मुंबईत याचे बहुतांश चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटात तापसीसह सुप्रिया पाठक, अभिषेक बॅनर्जी, प्रियांशू पेन्युली आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट नंदा पेरियासामी यांच्या मूळ कथेवर आधारित आहे. चित्रपटाचे लेखन नंदा पेरियासामी यांच्यासह अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांची आहे.
या स्पोर्ट्स ड्रामाव्यतिरिक्त तापसी सध्या क्रिकेटर मिताली राज हिच्या आयुष्यावर बेतलेल्या 'शाबाश मिठू'च्या चित्रीकरणात बिझी आहे. शिवाय तिच्याकडे 'ब्लर' आणि 'लूप लपेटा' हे चित्रपटदेखील आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.