आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IT रेडवर तापसी पन्नूची मन की बात:तापसी म्हणाली - येथे काहीही घडू शकतं हे मागील काही वर्षात लक्षात आलंय, मी गुन्हेगार नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मला याची अपेक्षादेखील नव्हती'

आयकर विभागाच्या कारवाईमुळे अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या कारवाईदरम्यान तापसीचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला होता. शनिवारी तो तिला परत करण्यात आला. आता एका बातचीतदरम्यान 33 वर्षीय तापसीन छाप्याबद्दल सांगितले आहे. तिच्या मते, ती पब्लिक पर्सनॅलिटी असल्यामुळे या कारवाईला सामोरे जायला ती तयार होती. मात्र तिच्या कुटुंबीयांसाठी हा एक धक्का होता. सोबतच मागील काही वर्षांत येथे काहीही घडू शकतं, हे तिला समजून चुकले आहे.

'मला याची अपेक्षादेखील नव्हती'

द क्विंटशी बोलताना तापसी म्हणाली, "जेव्हा ते (आयटी अधिकारी) माझ्याकडे आले तेव्हा मला सांगण्यात आले की माझ्या दिल्ली आणि मुंबईतील इतर ठिकाणांचीही चौकशी केली जात आहे. मला याबद्दल माहिती देण्यात आली. पण असे काही माझ्याबाबतीत, विशेषतः माझ्या कुटुंबीयांसोबत घडेल, याचा मी कधी विचारदेखील केला नव्हता. हे सर्व त्यांच्यासाठी धक्कादायक होते. त्यांना यापूर्वी असे काही पाहिले नव्हते," असे तापसीने सांगितले.

'हा पब्लिक फिगर असल्याचा दुष्परिणाम'
तापसी पुढे म्हणाली, "गेल्या काही वर्षांत किंवा महिन्यांत येथे काहीही घडू शकते, याची मला जाणीव झाली होती.मी एक पब्लिक पर्सनॅलिटी आहे. त्याचाच हा एक दुष्परिणाम आहे. मी पूर्णपणे ठीक आहे कारण जेव्हा मी काही चूक केली नाही तर मग घाबरायचे का? मी गुन्हेगार नाही. मी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. त्यामुळे मला त्याच्या परिणामांची भीती वाटत नाही," असे तापसीने स्पष्ट केले.

पाच कोटींच्या पावतीवर दिली प्रतिक्रिया

या कारवाईमुळे धक्का बसला, असे तापसीने या बातचीतदरम्यान सांगितले. परंतु याचा अर्थ घाबरुन मी स्वतःला बदलेले, असा होता नाही, असे ती म्हणाली. शिवाय पाच कोटींच्या पावतीवरदेखील तापसीने प्रतिक्रिया व्यक्त केली. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये तापसीने पाच कोटी घेतल्याचा दावा केला जात आहे. यावर तापसी म्हणाली, "ते पाच कोटी रुपये कुठे आहेत? हे मला जाणून घ्यायचे आहे. मला आयुष्यातील कोणत्याही कामासाठी आजपर्यंत एवढी रक्कम देण्यात आलेली नाही. मी ती पावती माझ्यासाठी फ्रेम करुन ठेवेन," असे तापसी म्हणाली.

मोबाइल मिळाल्यावर दिली होती कारवाईवर प्रतिक्रिया
शनिवारी आयटी अधिका-यांकडून मोबाईल परत मिळाल्यानंतर तापसी पन्नूने छाप्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली होती. तापसीने सलग तीन सोशल मीडिया पोस्ट केल्या होत्या. यात तिने लिहिले की, 'मुख्यत: तीन गोष्टींची तीन दिवस सखोल तपास करण्यात आला. 1. पॅरिसमध्ये असलेल्या तथाकथित बंगल्याची किल्ली. कारण मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे जाते.'

आपल्या दुसर्‍या पोस्टमध्ये, तापसीने छापेमारीतील दुसऱ्या मुद्द्यावर भाष्य केले होते. तिने लिहिले होते की 'कथित पाच कोटींची कथित पावती जी भविष्यासाठी आहे.' तापसी पन्नूला पाच कोटी रुपयांची रोख रक्कम देण्यात आली होती आणि तिच्या घरातून पावती मिळाल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता.

आपल्या तिसर्‍या पोस्टमध्ये तापसीने लिहिले होते की, सन्माननीय अर्थमंत्र्यांनुसार, 2013 मध्ये माझ्या येथे छापा पडला होता. यापुढे मी स्वस्तातली कॉपी राहिली नाही.' कंगनाचे नाव न घेता तिने कंगनाला टोला लगावला होता. कंगनाने तिला अनेकदा स्वस्तातली कॉपी म्हणून संबोधले होते.

3 मार्च रोजी आयटीने छापा टाकला होता

3 मार्च रोजी आयकर विभागाने तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधु मंटेना यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. विभागाच्या अहवालानुसार, तापसी आणि अनुराग यांनी सुमारे 350 कोटी रुपयांचा कर चोरला आहे.

बातम्या आणखी आहेत...