आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग शेड्युल:नैनीतालमध्ये 40 दिवस ब्लरचे चित्रीकरण करणार तापसी पन्नू, भवाली आणि सत्ताल येथेही जाणार टीम

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘ब्लर’मध्ये तापसी अन् गुलशन विवाहित जोडप्याच्या भूमिकेत, उकलणार हत्येचे गूढ
  • नैनीतालमध्ये 40 दिवस चालेल काम, नैसर्गिक पावसात सुरू आहे शूटिंग

कोरोनामुळे सध्या बऱ्याच चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू आहे. मुंबईच्या बाहेर निर्मात्यांना शूटिंग करावी लागल्यास ते सिंगल लोकेशनवरच शूटिंग करत आहेत. जेणे करुन बायोबबल मेंटेन करता येईल. उदाहरण म्हणून तापसी पन्नूच्या बॅनरमधील ‘ब्लर’ चित्रपटाचे शूटिंग सध्या नैनीतालमध्ये होत आहे. या व्यतिरिक्त विक्रमादित्य मोटवानी यांच्या बॅनरच्या ‘स्टारडस्ट’ चित्रपटाचेदेखील मनालीच्या सिंगल लोकेशनवर शूट करण्यात आले. ते फक्त दिवसाचे दृश्य होते. अपारशक्ती खुराणा आणि इतर कलाकारांसोबत तेथे शूट झाले होते.

  • 2 हजार लिटर पाण्याची केली व्यवस्था

‘ब्लर’विषयी बोलायचे झाले तर निर्माते मयंक तिवारीने सांगितले, मुंबईवरून 120 लोकांची टीम सध्या नैनीतालमध्ये पोहोचली आहे. ते तेथे बलरामपूरमध्ये थांबले आहेत. तापसी यात मुख्य भूमिकेत आहे. तिच्या पात्राचे नाव गौतमी आहे, ती एक विवाहित महिला असते. गौतमीचा पतीची भूमिका गुलशन देवैया साकारत आहेत. लग्नानंतर ते लगेचच नैनीतालमध्ये येतात. तेथे ते एका हत्येचे गूढ उकलण्यात व्यग्र होतात. चित्रपटाचे बरेच दृश्य पावसात चित्रित केले गेले आहेत. त्यासाठी दोन हजार लिटर पाण्याची व्यवस्था केली आहे. सध्या पाऊसही पडत आहे. त्याचाही त्यांना फायदा होत आहे.

  • नैनीतालमधील 20 स्थानिक कलाकारांना दिली संधी

चित्रपटाचे शूटिंग नैनीताल आणि त्याच्या जवळपासच्या भागात होणार आहे. बायोबबलची साखळी तुटू नये यासाठी नैनीताल शहराच्या व्यतिरिक्त तेथून फक्त 11 किलोमीटर दूर भवालीमध्ये जाऊन महत्त्वाचे दृश्य चित्रित केले जातील. नंतर रामगड आणि सत्तालमध्येही तापसी आणि गुलशन शूट करणार आहेत. ही दोन्ही ठिकाणं नैनीतालपासून एका तासाच्या अंतरावर आहे. नैनीतालमधून 20 कलाकार निवडण्यात आले.

  • कोरोना तपासणीसाठी मुंबईवरून घेऊन गेले आहेत टीम

काही दिवसांपूर्वी काही हॉटेल आणि काही ड्रायव्हिंगचे दृश्य चित्रित केले आहेत. सोबत तापसीचे पात्र गौतमी यांच्या घराचे दृश्येदेखील चित्रीत करण्यात आले आहेत. निर्मात्यांनी सेटवर पूर्ण सावधगिरी बाळगली आहे. मुंबईवरून एक प्रॉपर कोरोनाची तपासणी करणारी टीम सोबत आली आहे. त्यात एकूण आठ लाेक आहेत, त्यांचे काम कास्ट आणि क्रू यांचे प्रत्येक 10 दिवसाला रॅपिड अँटिजन आणि 14 व्या दिवशी आरटीपीसीआर तपासणी करणे आहे. शूटिंग सुरू होऊ बरेच दिवस झाले आहेत. आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह समोर आला नाही.

बातम्या आणखी आहेत...