आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘रश्मी रॉकेट’:तापसी पन्नूचा खुलासा - अ‍ॅथलीट भूमिकेसाठी बदलला नाही डाएट,  जिममध्ये घ्यावी लागली खूप मेहनत

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढील वर्षी रिलीज होणार ‘रश्मी रॉकेट’

अभिनेत्री तापसी पन्नूच्या आगामी रश्मी रॉकेट या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटात तापसी अ‍ॅथलीटच्या भूमिकेत झळकणार आहे. एका मुलाखतीत तापसी म्हणाली, 'अ‍ॅथलीटचा लुक मिळवण्यासाठी मी माझा डाएट बदलला नाही. माझ्या मते पारंपरिक भारतीय जेवणापेक्षा दुसरे चांगले काही नाही. पंजाबी मुलगी असल्याने माझ्या खाण्याच्या सवयी देखील सामान्य पंजाबी कुटुंबांप्रमाणेच आहेत. मला तूपासोबत पराठा आवडतो. पण रश्मी रॉकेटसाठी मला जिममध्ये खूप मेहनत घ्यावी लागली. ' दिग्दर्शक आकाश खुरानाच्या या चित्रपटात तापसीने एका गावातील मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

अभिनेत्याच्या मानधनासारखे असते स्त्रीप्रधान चित्रपटाचे बजेट
तापसीने पुढे सांगितले, ''माझ्या या चित्रपटाचे बजेट खूपच कमी आहे. अनेकदा स्त्रीप्रधान चित्रपटाचे बजेट एखाद्या अभिनेत्याच्या एका चित्रपटाच्या मानधनासारखे असते, त्यामुळे तुम्ही फक्त व्हीएफएक्सवर अवलंबून राहू शकत नाही. तुम्हाला तुमच्या बॉडीवरदेखील काम करावे लागते. त्यामुळे कोणतीही अभिनेत्री एका चित्रपटात वर्षभराची गुंतवणूक करू शकत नाही. कारण त्यांना पुरुष अभिनेत्याप्रमाणे मानधन मिळत नाही. चित्रपटाची तयारी आणि शूटिंगमध्ये वर्ष गेले तर माझ्या हातातून पाच चित्रपट जाऊ शकतील. माझ्या मते, व्यावहारिकरीत्या हे योग्य नाही.''

ट्रेनिंगच्या तिसऱ्या दिवशी हातपाय गळाले होते
या चित्रपटाच्या तयारीशी जोडलेला एका व्हिडिओ तापसीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, चित्रपटाची तयारी करणे खूपच अवघड होते. ट्रेनिंगच्या तिसऱ्या दिवशीच माझ्या शरीराने उत्तर दिले होते, म्हणजेच हातपाय गळून पडले होते. मी पळूच शकत नव्हते. त्यानंतर काही दिवस मी आराम केला. स्टेरॉइड घेण्यासही मी नकार दिला होता. मला या चित्रपटासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, खूप जिम करावे लागले. सध्या मी रश्मी रॉकेटसाठी आपल्या शेवट्च्या धावपटूचे प्रशिक्षण पूर्ण करत आहे. शिवाय या प्रवासाचा महत्त्वाचा शेअर करत आहे, जे मी बऱ्याच दिवसांपासून सांगू इच्छित होते.
​​​​​​​

रांचीचे केले कौतुक
रांचीच्या मोरहाबाडी येथील बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमवर तापसीने चित्रपटाचे शूटिंग केल. शूटिंगमुळे स्टेडियम सुरक्षेसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले होते. कोणालाही स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. एशियन गेम्सशी संबंधित दृश्याचे स्टेडियममध्ये चित्रीकरण येथे करण्यात आले. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर तापसीने येथील सौंदर्य आणि सोयी सुविधांचे कौतुक केले. सोशल मीडियावर अनुभव शेअर करताना तिने लिहिले की, येथील अनुभव खूप छान राहिला. रांची हे शहर जेवढे सुंदर आहे. तेवढेच येथील लिट्टी चोखा चविष्ट आहे. येथे पुन्हा यायला नक्की आवडेल.

पुढील वर्षी रिलीज होणार ‘रश्मी रॉकेट’
खरं तर ‘रश्मी रॉकेट’मध्ये तापसीने आपल्या धावपटू पात्रासाठी कठोर मेहनत घेतली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 2021 मध्ये रिलीज होणार आहे. यानंतर तापसीचे ‘हसीन दिलरुबा’, ‘शाबाश मिथु’ आणि ‘लूप लपेटा’ चित्रपटांचा सहभाग आहे.

बातम्या आणखी आहेत...