आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातापसी पन्नू ट्रोल करणाऱ्यांना नेहमीच परखड उत्तर देत असते. मात्र काही दिवसांपासून ती आता सोशल मीडियावर खूप कमी वेळ घालवते. नुकतेच माध्यमांशी बोलताना तापसीने सांगितले, सोशल मीडियाचा एका समाज तिला 'बेरोजगार’ म्हणतो मात्र माझ्या नोंदवहीत येणाऱ्या दोन वर्षाच्या तारखा फूल आहेत. तापसी नुकतीच हॉरर-कॉमेडी 'अॅनाबेले सेतुपती’ दिसली होती. तो गेल्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. तिच्या आगामी चित्रपटात क्रिकेटर मिताली राजचा बायोपिक 'शाबाश मिथु’, 'लूप लापेटा’, 'रश्मि रॉकेट’, अनुराग कश्यपचा 'दोबारा’ आणि 'ब्लर’ आहेत, याची निर्मिती तिच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये होणार आहे.
माझ्याकडे 2023 पर्यंत कोणताच नवा चित्रपट करण्यासाठी वेळ नाही
एका मुलाखतीत तापसने सांगितले, खरं तर मी आता ट्रोलर्सला उत्तर देत नाही. मी बऱ्याचदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. कारण हा एक अभियानाचा भाग आहे, कुणालाही विचार न करता ट्रोल करणे. त्यांच्याकडे काही महत्त्वाच्या गोष्टी नसतात आणि तुम्ही जेव्हा यशस्वी होतात तेव्हा ट्रिगर होतात. ते मला बेरोजगार म्हणतात मात्र माझ्याकडे तर 2023 पर्यंत एकही नवा चित्रपट करण्यासाठी वेळ नाही. हे मी ठामपणे सांगू शकते.
माझ्यात आणि ट्रोलर्समध्ये फरक आहे
मीडियाशी बोलताना तापसी म्हणाली, मला जेव्हा लोक ट्रोल करतात तेव्हा याचा परिणाम माझ्या कुटुंबावरदेखील होतो. मात्र मी त्यांच्यासोबत याविषयी बाेलत नाही. या गोष्टीं गांर्भीयाने घ्यायच्या नसतात, हे मी त्यांच्याकडून शिकले आहे. शिवाय सोशल मीडियावर मी माझो विचार व्यक्त करणे सोडणार नाही. मी माझा आवाज दाबणार नाही. माझा आवाज खूपच प्रभावी आहे, असे मला वाटते. त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे ते माझा आवाज बंद करु इच्छित आहेत, मी गप्प बसणार नाही. मी जेव्हा उत्तर देते तेव्हा ट्रोलर्सच्या पातळीपर्यंत जात नाही. मी उत्तर देण्यातही माझा आत्मसन्मान गमवणार नाही. हाच माझ्यात आणि ट्रोलर्समध्ये मोठे अंतर आहे.
विकी लग्नासाठी परफेक्ट मटेरियल
दुसरीकडे या मुलाखतीत तापसीला लग्नाचा प्रश्न विचारला. कोणता अभिनेता परफेक्ट आहे, यावर तिने खूपच मजेदार उत्तर दिले. तापसीला विचारण्यात आले, तुला कोणासोबत अफेअर करायला आवडेल? कुणासोबत लग्न करायला आवडेल ? किंवा कुणाला मारायची इच्छा आहे ? या प्रश्नाचे उत्तर देताना तापसी म्हणाली, अभिनेता वरुण धवनसोबत तिला अफेअर करायचे आहे, विकी कौशलसोबत लग्न आणि अभिनेते अभिषेक बच्चनला मारायचे आहे. तापसी म्हणाली, 'विक्की हॉट नाही मात्र लग्नासाठी तो एकदम परफेक्ट मटेरियल आहे.' खरं तर, तापसी आणि विकीने ‘मनमर्जियां’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात दोघांची चांगली गट्टी जमली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.