आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नुकताच टीआरपी चार्टच्या टॉप 5 शोजच्या लिस्टमध्ये पुन्हा सामिल झालेला शो तारक मेहता का उल्टा चश्माचे प्रोड्यूसर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. लक्षणे दिसल्यानंतर असित मोदींनी आपली कोरोना टेस्ट केली होती. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यानंतरपासून असित मोदींनी स्वतःला आयसोलेट केले आहे. याविषयाची माहिती देताना प्रोड्यूसरने नुकत्याच संपर्कात आलेल्या लोकांना सावधगिरी बाळकत कोविड 19 टेस्ट करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा शोचे निर्माता असित मोदी यांनी अलीकडेच आपल्या ट्विटरद्वारे माहिती दिली की, 'कोविड 19 च्या काही लक्षणांनंतर माझी चाचणी घेण्यात आली होती आणि माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत: ला आयसोलेट केले आहे. माझी विनंती आहे की जो कोणी माझ्या संपर्कात आला आहे त्याने काळजी घ्यावी आणि कोविड 19 शी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे फॉलो करावे.
After some symptoms of COVID19,I got myself tested & Report came positive.I have isolated myself.I request🙏🏻who has come in my contact to be careful and follow the protocol.😊आप मेरी चिंता ना करें,आप के प्यार❤️प्रार्थना🙏🏻आशीर्वाद से मैं जल्दी ठीक हो जाऊँगा.आप😀मस्त 💪स्वस्थ रहें
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) November 20, 2020
पुढे चाहत्यांना दिलासा देत असित यांनी लिहिले की, 'तुम्ही माजी काळजी करु नका, तुमचे प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वादाने मी लवकर बरा होईल, तुम्ही मस्त राहा, स्वस्थ राहा.'
टॉप टीव्ही शोजमध्ये सामिल झाला शो
नुकतेच 45 व्या आठवड्याचा बीएआरसीचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा शोने चांगले प्रदर्शन करत टॉप 5 टीव्ही शोजच्या लिस्टमध्ये पाचवा क्रमांक मिळवला आहे. यापूर्वी शो या लिस्टमधून बाहेर होता.
टीमने केले स्लम एरियात दिवाळी सेलिब्रेशन
दिवाळीच्या खास प्रसंगी तारक मेहता शोच्या टप्पू सेना आणि चंपक चाचा यांनी झोपडपट्टीच्या गरीब मुलांसोबत दिवाळी सेलिब्रेशन केले होते. टीम सेलिब्रेशनसाठी आपल्यासोबत मुलांसाठी नवीन कपडे, गिफ्ट, फटाके, फूल आणि मिठाई घेऊन गेली होती. सर्वांनी या खास प्रसंगी खूप डान्स करत मुलांच्या सणांत आनंद भरला.
तारक मेहताचे प्रोड्यूसर असित मोदींव्यतिरिक्त दबंग 3 चे प्रोड्यूसर निखिल द्विवेदी यांचाही कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.