आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बूने सांगितले आडनाव न वापरण्यामागील कारण:म्हणाली- माझ्या नावासोबत वडिलांचे आडनाव लावणे मला गरजेचे वाटत नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री तब्बूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा केला आहे. मला माझ्या संपूर्ण नावाने ओळखले जावे, असे कधीच वाटले नसल्याचे तब्बू सांगते. तिने सांगितल्यानुसार, तिच्या आई-वडिलांचा आधीच घटस्फोट झाला होता, त्यामुळे तिचे तिच्या वडिलांसोबतचे संबंध कधीच चांगले नव्हते, त्यामुळे तिने तिच्या नावासमोर वडिलांचे आडनाव कधीच लावले नाही. तब्बूचे पूर्ण नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे, पण फिल्म इंडस्ट्रीत तिला फक्त तब्बू या नावानेच ओळखले जाते.

माझ्या मनात माझ्या वडिलांविषयी प्रेम नाही - तब्बू
तब्बूने आपल्या मुलाखतीत खुलासा केला की, तिच्या मनात तिच्या वडिलांबद्दल मुळीच प्रेम नाही. तब्बू सांगते, तिला तिच्या वडिलांची कधीच आठवण येत नाही किंवा त्यांना कधी भेटावेसे वाटले नाही. वडिलांनी दिलेले आडनाव 'हाश्मी' हे आपल्या नावासोबत जोडणे महत्त्वाचे वाटत नसल्याचे ती सांगते. मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे सेटल झाली आहे त्यामुळे आता जुन्या गोष्टींचा विचार करण्यात काही अर्थ नाही, असे तब्बू म्हणाली.

लवकरच 'दृश्यम 2' मध्ये दिसणार आहे तब्बू
तब्बूचे नाव बॉलिवूडच्या अष्टपैलू अभिनेत्रींमध्ये गणले जाते. चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ती ओळखली जाते. अभिनयामुळे तिला दोनदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे, तसेच चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. अलीकडेच ती 'भूल भुलैया 2' मध्ये दिसली होती. आता लवकरच ती अजय देवगणसोबत 'दृश्यम 2'मध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...