आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

49 वर्षांची झाली तब्बू:तब्बूने सांगितले लग्न न होण्याचे कारण, म्हणाली - अजय देवगणमुळे आजपर्यंत अविवाहित राहिले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तब्बू म्हणाली - माझ्यासाठी अजय सर्वात महत्त्वाचा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू 49 वर्षांची झाली आहे. मात्र अद्याप तिने लग्न केलेले नाही. यामागच्या कारणाचा तब्बूने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत खुलासा केला होता. तब्बूच्या मते, ती अजय देवगनमुळे अद्याप अविवाहित आहे. एका पब्लिकेशनबरोबर बोलताना तब्बू म्हणाली होती की, अजयने जे केले त्याबद्दल त्याला नक्कीच वाईट वाटत असणार.

  • असे काय केले अजयने?

तब्बू म्हणाली, ''मी आणि अजय 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. अजय माझा कझिन समीर आर्यचा शेजारी आणि जवळचा मित्रही होता. मी जेव्हा छोटी होते, त्यावेळी समीर आणि अजय माझ्यावर लक्ष ठेवून असायचे. मला एखाद्या मुलाशी बोलताना पाहिले की, ते त्या मुलाला मारहाण करायचे. दोघे त्यावेळी फार गुंडगिरी करायचे. जर आज मी अविवाहित राहिले तर फक्त अजय देवगणमुळेच'', असे तब्बू म्हणाली.

  • आता अजयला म्हणाली - माझ्यासाठी मुलगा शोध...

रिपोर्ट्सनुसार अजयची त्याची खास मैत्रीण असलेल्या तब्बूचे लग्न व्हावे अशी त्याची इच्छा आहे. त्याबाबत तब्बू गंमतीत म्हणते की, मी अजयला नेहमी म्हणत असते की, माझ्यासाठी एखादा सुटेबल मुलगा शोध. तब्बू म्हणाली, माझे आणि अजयचे नाते फार चांगले आहे. सर्व मेल अॅक्टर्समध्ये माझ्यासाठी अजय सर्वात महत्त्वाचा आहे. तो अगदी लहान मुलांसारखा आणि खूप प्रोटेक्टीव्ह आहे.

  • अनेक चित्रपटांत तब्बू-अजयने केले एकत्र काम

अजय आणि तब्बू यांनी 'विजयपथ' (1994), 'हकीकत' (1995), 'तक्षक' (1999) आणि 'दृश्यम' (2015) आणि 'गोलमाल अगेन' (2017) मध्ये एकत्र काम केले आहे. तब्बू अलीकडेच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ए सुटेबल बॉयमध्ये दिसली होती. तर अजयचा मागील चित्रपट 2019 मध्ये आलेला 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा होता.