आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्क्रीनवर घाबरवणारे सेलेब्स:'भूल-भुलैया-2'मध्ये तब्बूची भूताची भूमिका, मधुबाला-अमिताभ यांनीही उडवली होती प्रेक्षकांची घाबरगुंडी

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया या कलाकारांबद्दल -

अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 2' ची जादू कायम आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 161 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात तब्बू भूताच्या भूमिकेत झळकली आहे. तब्बूशिवाय अनेक कलाकार याआधी भुताच्या भूमिकेत दिसले आहेत. चला तर मग आज बोलूया अशाच कलाकारांबद्दल ज्यांनी चित्रपटांमध्ये भुताची भूमिका साकारुन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

मधुबाला

1949 मधील 'महल' हा चित्रपट आठवतोय का? या चित्रपटात एक सुंदर लहान मुलगी राजवाड्यात "आयेगा आनेवाला... आयेगा... आयेगा" हे गाणे गाते. मधुबालाने चित्रपटात एका भटक्या आत्म्याची भूमिका साकारली होती.

विद्या बालन

2007 मध्ये आलेला 'भूल-भुलैया' हा एक कॉमेडी हॉरर चित्रपट होता, या चित्रपटातील विद्या बालनच्या अभिनयाने सर्वांना वेड लावले होते. चित्रपटात विद्यावर भूताची सावली दाखवण्यात आली होती. विद्याने चित्रपटाच्या शेवटी ज्या प्रकारे मंजुलिकाची भूमिका साकारली ती खरोखरच थरकाप उडवणारी होती.

अमिताभ बच्चन

2008 मध्ये आलेल्या 'भूतनाथ' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एका भटक्या आत्म्याची भूमिका साकारली होती. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता ज्यात जुही चावला आणि शाहरुख देखील झळकले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

शाहरुख खान

2005 मध्ये आलेला 'पहेली' हा चित्रपट एका गावाच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात शाहरुखच्या सोबत राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत झळकली. या चित्रपटात नववधूचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेल्यावर त्याच्या रुपात भूत तिच्यासोबत राहते. या चित्रपटात शाहरुखने त्याच भुताची भूमिका वठवली होती.

अदा शर्मा

2008 मध्ये अदा शर्माने '1920' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या चित्रपटात अदाला भुताने पछाडले होते. यात अनेक अशी भयावह दृश्ये होती, ज्यामुळे प्रेक्षकांची घाबरगुंडी उडाली होती. या चित्रपटात अदाच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपट केले पण 2018 मध्ये आलेल्या 'स्त्री' चित्रपटात श्रद्धाने सर्वांना घाबरवले. या चित्रपटात श्रद्धाने भुताची भूमिका वठवली होती. तिच्यासोबत राजकुमार राव या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने लोकांना खूप हसवले आणि खूप घाबरवले.

अक्षय कुमार

'लक्ष्मी' हा 2020 मध्ये प्र​​​​​​​दर्शित झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट होता. अक्षयने या चित्रपटात भूताची भूमिका साकारली होती. हा चित्रपट कांचना या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. कांचनामध्ये राघवन लॉरेन्सने उत्तम काम केले होते. पण त्याचाच रिमेक असलेल्या 'लक्ष्मी'ला लोकांचे फारसे प्रेम मिळाले नाही.

विद्या माळवदे

​​

2012 मध्ये आलेल्या '1920 - द एव्हिल रिटर्न्स' या हॉरर चित्रपटात विद्याने भूताची भूमिका साकारली होती. आफताब शिवदासानीने या चित्रपटात कवीची भूमिका साकारली. विद्याने या चित्रपटात तिच्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय दिला होता.

बातम्या आणखी आहेत...