आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षांनंतर कमबॅक:शर्मिला टागोर 'गुलमोहर' चित्रपटातून येणार प्रेक्षकांसोर, यावर्षी ऑगस्टमध्येच रिलीज होणार

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शर्मिला टागोर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. ‘गुलमोहर’ चित्रपटातून शर्मिला 11 वर्षांनंतर चित्रपटात पुनरागमन करत आहेत. या चित्रपटात शर्मिला बत्रा कुटुंबातील आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयी, अमोल पालेकर, सूरज शर्मा आणि सिमरन ऋषी बग्गा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट या वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा बहु-पिढ्या, बत्रा कुटुंबाभोवती फिरते. अर्पिता मुखर्जीसह राहुल चित्तेला यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

‘गुलमोहर’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सैफ अली खानची आई आणि करिना कपूरची सासू शर्मिला टागोर बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री आहे. एक काळ असा होता जेव्हा या ‘कश्मीर की कली’चे अनेक चाहते होते. 60-70 च्या काळात त्यांनी अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले. शर्मिला टागोर यांचा अमर प्रेम, अपूर संसार, अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरीस, आ गले लग जा, कश्मीर की कली, चुपके चुपके, मौसम, सावन की घटा, सफर मधील अभिनय प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. लग्नानंतर मात्र पतौडी खानदानची बहू झाल्यामुळे आणि मुलांच्या संगोपनासाठी शर्मिला टागोर यांनी त्यांचे करिअर सोडून दिले होते.

अधून मधून त्या एखाद्या चित्रपटात काम करायच्या. मात्र गेली 11 वर्ष कोणत्याच चित्रपटात त्यांची झलक पाहायला मिळाली नव्हती. 2010 मध्ये ‘ब्रेक अप के बाद’ या चित्रपटात त्यांनी शेवटचे काम केले होते. आता मात्र तैमूर आणि जेहची आजी शर्मिला टागोर बॉलीवूडला पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 11 वर्षांनंतर शर्मिला बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे.

अशी आहे गुलमोहरची कथा
गुलमोहर एक कौटुंबिक चित्रपट आहे. ज्याची कथा मल्टी जनरेशन असलेल्या बत्रा कुटुंबाभोवती फिरत राहते. बत्रा कुटुंब त्यांचे पस्तीस वर्ष जुने घर सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणार आहेत. अशा परिस्थिती भावुक झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील नाती आणखी मजबूत होताना यात दाखवली जाणार आहेत. नात्यांना एका धाग्यात बांधण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे का हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जेव्हा एकमेकांची रहस्य समजल्यामुळे मनात असुरक्षित भावना निर्माण होतात तेव्हा नात्यांचा खरा अर्श समजतो.

शर्मिला टागोर या चित्रपटात बत्रा कुटुंबाची मुख्य सदस्य म्हणजेच कुलमाताची भूमिका साकारत आहे. त्यांच्या मते या प्रोजेक्टचे शूटिंग सेटवरही कौटुंबिक आणि वातावरण निर्माण करणारे होते. म्हणूनच त्यांनी कथा ऐकताच या चित्रपटात काम करण्यात त्वरीत होकार कळवला होता. त्यांना या चित्रपटाची कथा मनाला अलगद स्पर्श कऱणारी वाटली. म्हणून त्यांनी हा चित्रपच करण्याचा निर्णय घेतला. सहाजीकच या चित्रपटाला प्रेक्षकही तितकेच प्रेम देतील अशी त्यांना आशा आहे. 11 वर्षांनी पुन्हा एकदा मोठया पडद्यावर शर्मिला टागोरला पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.

बातम्या आणखी आहेत...