आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार वॉर्स थीमवर तैमूरचा प्री-बर्थडे बॅश:करीना कपूरने शेअर केले इनसाइड फोटो, म्हणाली - ही पार्टी हिट होती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची लोकप्रिय जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमूर अली खान 20 डिसेंबर 2022 रोजी सहा वर्षांचा होणार आहे. यानिमित्ताने त्यांनी प्री बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. ही पार्टी स्टार वॉर्स थीमवर ठेवण्यात आली होती. करीनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना या ग्रँड पार्टीची खास झलक दाखवली आहे.

तैमूर बाऊन्सी कॅसलवर खेळताना दिसला

करीनाने शेअर केलेल्या पार्टीच्या फोटोमध्ये तैमूर बाऊन्सी कॅसलवर खेळताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत करीनाने लिहिले, 'हे पाहता ही पार्टी हिट झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. माझी जेडी टिम.' यासोबतच करीनाने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सैफसोबत पोज देताना दिसत आहे.

चला पाहूया पार्टी इनसाइड फोटो...

तैमूर पार्टीत खूप मस्ती करताना दिसत आहे.
तैमूर पार्टीत खूप मस्ती करताना दिसत आहे.
या फोटोमध्ये स्टार वॉर्स थीमचा बर्थडे केकही दिसत आहे.
या फोटोमध्ये स्टार वॉर्स थीमचा बर्थडे केकही दिसत आहे.
या फोटोमध्ये सैफ-करीना मुलगा तैमूरसोबत पोज देत आहेत.
या फोटोमध्ये सैफ-करीना मुलगा तैमूरसोबत पोज देत आहेत.
या ग्रँड पार्टीत तैमूरने खूप एन्जॉय केल्याचे दिसते.
या ग्रँड पार्टीत तैमूरने खूप एन्जॉय केल्याचे दिसते.
या वाढदिवसाच्या पार्टीत कृत्रिम रोबोटही दिसले.
या वाढदिवसाच्या पार्टीत कृत्रिम रोबोटही दिसले.

सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे करीना कपूर

सैफ आणि करीनाबद्दल बोलायचे झाले तर दोघांनीही चार वर्षे डेटिंग केल्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केले. त्यांना तैमूर आणि जेह ही दोन मुले आहेत. करीना ही सैफची दुसरी पत्नी आहे. सैफ अली खानचे पहिले लग्न अमृता सिंगसोबत झाले होते, मात्र दोघांचा घटस्फोट झाला होता. सैफ आणि अमृताला सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत.

बातम्या आणखी आहेत...