आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील गोष्टी:जेव्हा चीनचे पंतप्रधान तलत यांचा आवाज ऐकून नाचू लागले, दिलीप कुमार यांच्यासाठी गायले मूळ शैलीत गाणे

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 2016 मध्ये तलत यांच्या नावाने पोस्टाचे तिकीटही निघाले
 • 1992 मध्ये पद्मभूषणने सन्मानित
 • 800 गाणे चार दशकांच्या करिअरमध्ये गायले तलत महमूद यांनी.

गझलसम्राट म्हणवले जाणारे तलत महमूद यांच्या आवाजात एक वेगळीच जादू होती. त्यांच्या गायकीची खास शैली लोकांना वेड लावायची. जगजित सिंह आणि आणि पंकज उधास सारखे गायक त्यांना आपले आयडल मानतात.  त्यांचे अनेक गाणे चाहत्यांच्या आठवणीत आहेत, मात्र एक गाणे आजही वेड लावून जाते..., ‘जलते हैं जिसके लिए तेरी आंखों के दीये…’

तलत महमूद यांनी फक्त 15 वर्षांच्या वयात गायनाला सुरुवात केली. ऑल इंडिया रेडिओच्या लखनऊ स्टेशनवर तलत मीर तकी मीर, दाग देहलवी, जिगर मुरादाबादी यांच्या गजल गात होते. त्यांची प्रतिभा पाहून संगीत कंपनी एचएमव्हीने 1944 मध्ये एक अलबम ‘सब दिन एक समान नहीं’ काढला. 19 वर्षांच्या तलत यांना आपल्या या पहिल्या रेकॉर्डिंगसाठी फक्त 6 रुपये मिळाले होते. यानंतर त्यांनी कोलकात्यात काही बंगाली चित्रपटासाठी गाणी गायली. तेथेच त्यांना तपन कुमार नावदेखील मिळाले. देखणे असल्यामुळे त्यांना तीन बंगाली चित्रपटात कामही मिळाले. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. त्यांना पहिला ब्रेक ‘शिक़स्त’मधील गाणे ‘सपनों की सुहानी दुनिया को’मधून मिळाला, तर 1944 मध्ये गायलेल्या ‘तस्वीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी…’ या गाण्यातून प्रसिद्ध मिळाली.

 • दिलीप कुमार यांच्यासाठी गायले मूळ शैलीत गाणे

तलत सर्वात आधी जेव्हा मुंबईला परतले तेव्हा प्लेबॅक सिंगर अनिल विश्वास यांनी त्यांना 1950 मध्ये पार्श्वगायनाची संधी दिली. हा चित्रपट दिलीप कुमार यांचा आरजू होता. अनिल विश्वास यांचा कडक स्वभाव तलत यांना माहीत होते त्यामुळे त्यांनी घाबरतच गाणे गायले. त्यामुळे त्यांच्या आवाजाची मूळ शैली राहिलीच नाही, तेव्हा अनिल विश्वास त्यांच्यावर ओरडले आणि मला तुझा तुझ्याच शैलीतील मूळ आवाज हवा, असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी दिलीप कुमारसाठी ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल’, हे गाणे गायले आणि ते हिट झाले. त्यानंतर मुंबईच्या संगीतकारांना संगीत जगतात कोणीतरी दिगगज आल्याचे कळाले. तलत सारखा आवाज दुसरा कोणीच काढू शकत नाही, याची खात्री अनिल विश्वास यांना होती. रफी, किशोर, मुकेश यांचे अनेक डुप्लिकेट मिळतात मात्र तलतचा डुप्लिकेट मिळणे अवघड आहे.

 • आलाप ऐकूनच मिळाले भातखंडे संगीत महाविद्यालयात प्रवेश

तलत यांनी संगीताचे शिक्षण लखनऊच्या भातखंडे संगीत महाविद्यालयात घेतले. तेथे प्रवेश घेण्यासाठी परीक्षा दिली, मात्र लिखित परीक्षेत काही खास करू शकले नाही, मात्र जेव्हा स्वर परीक्षा झाली तेव्हा परीक्षक त्यांचा आलाप ऐकून चकित झाले. एकही प्रश्न न विचारता तलत यांना प्रवेश मिळाला. त्यानंतर तलत यांनी चित्रपट ‘शिकस्त’मधील गाणे ‘सपनों की सुहानी...’च्या पहिल्या पन्नास सेकंदांत हाच आलाप गायला.

 • जेव्हा किशोर कुमारने बोलावून आपल्यासोबत मंचावर बसवले

तलत महमूद यांची मुलगी सबिना सांगते, एकदा मला षण्मुखानंद हॉलमध्ये किशोर कुमार यांच्या एका काॅन्सर्टमध्ये जायचे होते. वडिलांना मी ही गोष्ट सांगितली. त्यांनी त्या कॉन्सर्टचे तिकीट विकत घेतले आणि स्वत: माझ्यासोबत किशोर कुमार यांना ऐकण्यासाठी षण्मुखानंद हॉलमध्ये गेले. त्या कार्यक्रमात कोणीतरी त्यांना ओळखले आणि ही बातमी किशोर कुमार यांच्यापर्यंत पोहोचली की, तलत महमूद आपल्या मुलीसोबत हॉलमध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर किशोर यांनी मंचावरुन घोषणा केली, आपल्यात तलत साहेब बसलेले आहेत. त्यांनी वडिलांना मंचावर बोलावले आणि म्हणाले..., तलत साहेब तुमची जागा तेथे नाही, येथे आहे. तुम्ही स्टेजवर माझ्या जवळ बसा.

 • जेव्हा चीनचे पंतप्रधान तलत यांचा आवाज ऐकून नाचू लागले

1962 मध्ये चीनचे तत्कालीन पंतप्रधान चाऊ एन लायी भारतात आले तेव्हा मुंबईत त्यांच्या सन्मानासाठी एका संगीत समारंभाचे आयोजन करण्यात आले. तलत महमूद आणि गीता दत्त यांना परफॉर्म करण्यासाठी बोलावण्यात आले. अर्ध्या तासाने चाऊ एन लायी यांनी ‘आवारा’ चित्रपटातील ‘आवारा हूं..’ गाणे ऐकण्याची फरमाइश केली. ते गाणे गाणारे गायक मुकेश कार्यक्रमात नव्हते तेव्हा आयोजकांनी तलत यांना तुम्हीच ते गाणे म्हणावे अशी विनंती केली. तलत यांच्या आवाजात ते गाणे ऐकूणन चीनचे पंतप्रधान नाचू लागले. 

 • कार्यक्रमात बसलेले किशोर म्हणाले... चला गुपचूप निघून जाऊ या...

मन्ना डे यांची आत्मकथा ‘मेमोरीज़ कम अलाइव’मध्ये त्यांनी लिहिले.. एकदा मदन मोहन यांनी मुंबईत आलेल्या मलिका-ए-गजल बेगम अख्तर यांच्या सन्मानार्थ एक पार्टी दिली होती. त्यात संगीत जगतातील दिग्गज कलाकारांना बोलावण्यात आले होते. जेवणाच्या आधी संगीताची एक मैफल झाली. सर्वात आधी तलत महमूद यांना माइकवर काहीतरी ऐकवण्याची फरमाइश झाली. त्यांनी गझल गायली.. गझल संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला, ते पाहून किशोर कुमार म्हणाले, चला आता आपण दोघे गुपचूप निघून जाऊ. तलत यांनी पसरवलेल्या जादूनंतर आता आपल्याला कोणी ऐकणार नाही.

 • लंडनच्या राॅयल अल्बर्ट हॉलमध्ये गाण्याचा गौरव

1979 मध्ये तलत मेहमूद यांना लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये गाण्याची संधी मिळाली. त्यांची विनोदबुद्धीही चांगली होती. त्यांना कॉमिक्स वाचण्याचीसुद्धा आवड होती. यासोबतच त्यांना आइस्क्रीम खाण्याचीदेखील आवड होती. नेहमीच सूटबूटमध्ये रहायचे. जग फिरण्याचीही आवड होती. पन्नासच्या दशकातच त्यांनी विश्व दौरा सुरू केला होता. लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये गाणारे ते दुसरे भारतीय गायक ठरले. 21 मार्च 1974 रोजी लता मंगेशकर यांनी तेथे परफॉर्म केले होते.

 • दक्षिण आफ्रिकेत गायनातून जिंकली श्रोत्यांची मने

तलत मेहमूद यांना 1956 मध्ये स्टेज शोसाठी दक्षिण आफ्रिकेला बोलावण्यात आले होते. अशा स्टेज शोसाठी एखाद्या कलाकाराला भारताबाहेर जाण्याची ही पहिली संधी होती. त्यांचा हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला की, दक्षिण आफ्रिकेच्या बऱ्याच शहरांमध्ये त्यांचे 22 कार्यक्रम झाले. देश-परदेशात ‘तलत मेहमूद नाइट’ होऊ लागल्या. 1962 मध्ये त्यांनी चिराग जलता रहा या पाकिस्तानी चित्रपटात दोन गाणी गायली.

 • कराचीत झालेल्या कार्यक्रमात तलत यांची तीन गाणी ऐकायला जमले 58 हजार लोक

1961 मध्ये कराचीत तलत यांची एक मैफल झाली. या मैफलीत तलत यांना ऐकण्यासाठी आलेल्या लोकांची संख्या सुमारे 58 हजार होती. ही मैफल इतकी हिट ठरली की, यानंतर मलिका ए तरन्नुम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायिका नूरजहांने तलतला फोन करून लाहोरमध्ये त्यांच्या कार्यक्रमात येण्याची विनंती केली. मात्र, व्यग्र वेळापत्रक असल्यामुळे तलतने नूरजहांला नकार दिला. त्यानंतही नूरजहांने तलतला एक कोरा चेक पाठवला आणि त्यांच्या इच्छेनुसार रक्कम भरण्यास सांगितले, मात्र तरीही तलत यांनी नम्रपणे त्यांना नकार दिला.

 • तलतसाठी निर्मात्याला भांडले संगीतकार मदन मोहन

1964 मध्ये आलेल्या जहांआरा चित्रपटाचे संगीत बनवण्याच्या वेळी तलत यांनीच चित्रपटातील सर्व गाणी गावीत अशी इच्छा संगीतकार मदन मोहन यांची होती. मात्र, मोहम्मद रफी यांनीदेखील चित्रपटातील काही गाणी गावीत, असे निर्मात्याने सांगितले. मात्र, मदन मोहन अडून बसले. हा विषय आणखीनच चिघळत चाललेला पाहून मदन मोहन यांनी खिशातून पैसे खर्च करत तलत यांच्याकडून सर्व गाणी गाऊन घेतली. शेवटी, तलतने गायलेल्या या चित्रपटाची सर्व गाणी हिट झाली. त्यातील एक गाणे... ‘फिर वही शाम…’ हो या फिर ‘तेरी आंख के आंसू पी जाऊं…’।

तलतचे काही हिट गाणे

 

 • ‘जाएं तो जाएं कहां...’ - टॅक्सी ड्रायव्हर
 • ‘दिल-ए-नादां तुझे हुआ क्या है...’ - मिर्झा गालिब
 • ‘जलते हैं जिसके लिए...’ - सुजाता
 • ‘इतना न तू मुझसे प्यार बढ़ा...’ - छाया
 • ‘ऐ मेरे दिल कहीं और चल...’ - दाग
 • ‘मेरी याद में तुम न आंसू बहाना...’ - मदहोश
बातम्या आणखी आहेत...