आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा एकत्र दिसले तमन्ना-विजय:न्यू इयर सेलिब्रेट करुन मुंबईत परतले, दोघांचा किसींग व्हिडिओ झाला होता व्हायरल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तमन्ना ‘डार्लिंग’ फेम अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तमन्ना आणि विजयचा एकमेकांना किस करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान तमन्ना आणि विजय नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर मुंबईत परतले आहेत. मुंबई विमानतळावरचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तमन्ना अतिशय सिंपल लूकमध्ये दिसतेय. तर विजयदेखील याचवेळी विमानतळाबाहेर पडताना दिसला. यावेळी दोघांनी मात्र एकत्र कॅमेऱ्यासमोर येणे टाळले.

गोव्यात होते एकत्र
तमन्ना भाटियाच्या फॅन पेजवरुन विजय वर्माबरोबरचा तिचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या पार्टीचा हा व्हिडिओ असल्याची चर्चा आहे. या व्हिडिओत एक कपल एकमेकांना किस करताना दिसले. हे दुसरे तिसरे कोणी नसून तमन्ना व विजय असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

तमन्ना भाटिया व विजय वर्मा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. याआधीही दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. परंतु, तमन्ना आणि विजय यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. तमन्ना आणि विजयच्या या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. हे दोघेही 'लस्ट स्टोरीज 2'मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

तमन्ना आणि विजय यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर विजय लवकरच 'मिर्झापूर 3’ या वेब सिरीजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तर तमन्ना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोल चुडिया’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...