आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या विळख्यात तमन्ना:आईवडिलांनंतर आता तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण; वेबसीरीजच्या शूटिंग दरम्यान झाला संसर्ग, हैदराबादच्या रुग्णालयात दाखल

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेब सीरिजच्या शूटिंगसाठी हैद्राबादला रवाना होण्यापूर्वी तमन्ना मुंबई होती.

'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला कोरोनाची लागण झाली आहे. ती हैदराबादमध्ये एका वेब सीरिजचे शुटिंग करत होती. चित्रीकरणादरम्यान तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यापूर्वी तिच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा देखील ती आयसोलेशनमध्ये होती.

ऑगस्टमध्ये आईवडिलांना झाला होता कोरोना संसर्ग
वृत्तानुसार, तमन्नाला हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल आहे. तज्ञांच्या पथकाद्वारे तिच्यावर उपचार सुरू आहेत. ऑगस्टमध्ये, तमन्नाने तिचे वडील संतोष भाटिया आणि आई रजनी भाटिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. तमन्नाने सांगितले होते की, माझ्या कुटुंबियांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्याने, खबरदारी म्हणून आम्ही सर्वांनी कोरोना चाचणी केली. आणि या चाचणी दरम्यान माझ्या आई-वडिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यावेळी तमन्नासह तिच्या स्टाफ मेंबर्सची चाचणी निगेटिव्ह आली होती.

हे आहेत तमन्नाचे आगामी प्रकल्प
तमन्ना सध्या तेलुगू चित्रपट 'सीटीमार'चे चित्रीकरण सुरु होण्याची वाट पहात होती. या चित्रपटात गोपीचंद मुख्य भूमिकेत असून हा एक अ‍ॅक्शन ड्रामा आहे. तमन्नाचा आणखी एक हिंदी चित्रपट 'बोले चुडिया' रिलीजसाठी सज्ज आहे. रिपोर्ट्सनुसार, तमन्ना ज्या वेब सीरिजची शूटिंग करत होती, सध्या त्याचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. सेटवरील इतर सर्व सदस्य आयसोलेशनमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...