आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळ अभिनेता लोकेश राजेंद्रनची आत्महत्या:घटस्फोटामुळे डिप्रेशनमध्ये, दारूचे व्यसन जडले, बस स्टँडवर झोपायचा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळ टीव्ही अभिनेता लोकेश राजेंद्रनने वयाच्या 34व्या वर्षी आत्महत्या केली. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश यांना कौटुंबिक समस्यांमुळे दारूचे व्यसन जडले होते आणि ते चेन्नई मुफसिल बस टर्मिनस (सीएमबीटी) वर अनेकदा झोपलेले दिसायचे. त्यांच्या मृत्यूनंतर सीआरपीसी कलम 174 अन्वये प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

4 ऑक्टोबरच्या रात्री मृत्यू

पोलिसांनी सांगितले की, 'सोमवारी (3 ऑक्टोबर) बस टर्मिनसवरील प्रवाशांच्या लक्षात आले की त्यांची प्रकृती ठीक नव्हती. काहींनी रुग्णवाहिकेसाठी 108 वर फोन केला आणि पोलिसांनाही माहिती दिली. त्यानंतर त्यांना सरकारी किलपॉक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, मंगळवारी 4 ऑक्टोबरच्या रात्री त्यांचे निधन झाले. लोकेश विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत.

कौटुंबिक समस्यांमुळे लोकेश डिप्रेशनमध्ये

याबाबत खुलासा करताना लोकेश यांचे वडील म्हणाले, 'लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये काही गैरसमज झाल्याचे मला काही महिन्यांपूर्वी समजले. त्यानंतर लोकेशच्या पत्नीनेही चार दिवसांपूर्वी त्याला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली होती. यामुळे तो नैराश्यात होता. मी शुक्रवारी त्याला शेवटचे पाहिले. त्या दिवशी त्याने मला सांगितले की त्याला काही पैशांची गरज आहे. मी ते त्याला दिलेही. लोकेशने आता संपादक म्हणून काम सुरू करणार असल्याचे सांगितले होते.

150 मालिकांमध्ये काम

लोकेश एक लोकप्रिय तमिळ टीव्ही अभिनेते होते. 'मर्मदेशम' या मालिकेतून लोकेश यांना बालकलाकार म्हणून ओळख मिळाली. त्यांनी जवळपास 150 मालिकांमध्ये काम केले. याशिवाय ते तमिळमधील आघाडीचे अभिनेते विजयकांत, प्रभू आणि इतरांसोबतही दिसले होते. त्यांनी जवळपास 15 चित्रपटांमध्येही काम केले.

बातम्या आणखी आहेत...