आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात तामिळ अभिनेता:सुपरस्टार सूर्या शिवकुमारची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह, म्हणाला- अजूनही सर्व काही सामान्य झालेले नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूर्या शिवकुमारने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

तामिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सूर्या शिवकुमारची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 'सूर्या सिंघम' फेम सूर्याने स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर सध्या उपचार घेत असल्याचे सूर्याने सांगितले आहे.

'मला आता बरं वाटतंय'
सूर्याने पोस्टमध्ये लिहिले, "मला कोरोना संसर्ग झाला आहे आणि माझ्यावर सध्या उपचार सुरु आहेत. आता मला बरे वाटत आहे. आयुष्यात अद्याप सर्व काही सामान्य झालेले नाही, हे आम्हाला सर्वांना समजले आहे. खरं तर घाबरुन आपण फक्त बसू शकत नाही. त्यामुळे आपल्याला सुरक्षित राहून काळजी घेण्याची गरज आहे. माझ्या पाठिशी उभे असलेले सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार," अशा आशयाची पोस्ट सूर्याने शेअर केली आहे.

आगामी 'नवरस' चित्रपटात दिसणार आहे सूर्या
चित्रपट निर्माते राजशेखर पांडियन यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे, "अण्णा ठीक आहेत आणि काळजी करण्यासारखे काही नाही." सूर्याचे चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

सूर्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने अलीकडेच मणिरत्नम यांच्या आगामी 'नवरस' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम मेनन यांनी केले आहे. यापूर्वी सूर्या 'सोरारई पोटरु' या चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट ओटीटीवर सुपरहिट ठरला होता.

बातम्या आणखी आहेत...