आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का:अभिनेते थवासी यांचे कर्करोगाने निधन, हलाखीच्या परिस्थितीमुळे चाहत्यांकडे केली होती आर्थिक मदतीची मागणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • थवासी यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

तामिळ अभिनेते आणि कॉमेडियन थवासी यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. 23 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. प्रकृती खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी मदुराई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

कर्करोगामुळे त्यांची अवस्था फारच बिकट झाली होती.
कर्करोगामुळे त्यांची अवस्था फारच बिकट झाली होती.

सोशल मीडियावर व्हायरल झाला होता इमोशन व्हिडिओ
काही दिवसांपूर्वी थवासी यांचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शेवटच्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली होती. उपचारांसाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. यासाठी त्यांनी चाहत्यांकडे आर्थिक मदत मागितली होती. व्हिडिओत ते म्हणाले होते, “मी गेली अनेक वर्ष कर्करोगाशी लढतोय. माझी सर्व संपत्ती मी उपचारासाठी खर्च केली. आजारी असल्यामुळे गेल्या काही वर्षांत मी कामही केलेलं नाही. परिणामी मी आता आर्थिक संकटात सापडलो आहे. कृपया कोणीतरी मला मदतीचा हात द्यावा. मी आजन्म तुमचा ऋणी राहिन.”

यानंतर थवासी यांच्या मदतीसाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार पुढे आले होते. निर्माते-अभिनेत शिवकार्तिकेयन विजय सेतुपती, रोबो यांच्यासह दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी थवासींना आर्थिक मदत केली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser