आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आत्महत्येचा प्रयत्न:तामिळ अभिनेत्री विजयालक्ष्मीने नेता सीमन आणि त्यांच्या समर्थकांच्या त्रासाला कंटाळून केला आत्महत्येचा प्रयत्न, यापूर्वी व्हिडिओत ऐकवली आपबीती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजयालक्ष्मीने व्हिडिओमध्ये तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल अभिनेता-राजकारणी सीमन यांना जबाबदार धरले आहे.
  • अभिनेत्रीने चाहत्यांना म्हटले - सीमन यांना या प्रकरणातून पळ काढू देऊ नका, त्यांना अटकपूर्व जामीन मिळू नये

तामिळ आणि मल्याळम चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री विजयलक्ष्मीला आत्महत्येच्या प्रयत्न केला असून तिला तातडीने चेन्नईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. तामिळ राजकीय नेते सीमन आणि त्यांच्या समर्थकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे विजयालक्ष्मीने म्हटले आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी तिने आपल्या फेसबुक प्रोफाइलवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला होता. सोशल मीडियावरुन होणा-या त्रासामुळे आपण मानसिक तणावात असल्याचे तिने म्हटले आहे.

  • आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी पोस्ट केला व्हिडिओ

विजयालक्ष्मीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी रविवारी संध्याकाळी चारच्या सुमारास फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याला तिने "हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. अलविदा माझ्या मित्रांनो", असे कॅप्शन दिले होते. मीडियात ही बातमी आल्यानंतर या अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आला आणि तिचे प्रोफाइल लॉक करण्यात आहे.

  • व्हिडिओमध्ये विजयालक्ष्मी काय म्हणाली-

विजयलक्ष्मीने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने सीमन आणि त्याच्या पक्षाच्या लोकांनी कशाप्रकारे तिला त्रास दिला असल्याचे स्पष्टपणे सांगितले. व्हिडिओत ती म्हणाली, 'हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे आणि गेल्या चार महिन्यांपासून सीमन आणि त्यांच्या पक्षातील समर्थकांमुळे मी प्रचंड तणावात आहे. आई आणि बहिणीसाठी जीवंत राहण्याचा मी प्रयत्न केला. पण अलीकडेच हरि नादर यांनी मीडियात माझा अपमान केला. मी आधीच बीपीच्या गोळ्या खाल्ल्या आहेत. त्यामुळे काही वेळात माझे बीपी कमी होईल आणि काही तासांमध्ये माझा मृत्यू होईल.'

या व्हिडिओमध्ये विजयलक्ष्मी पुढे म्हणाली की, 'हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या चाहत्यांना मी सांगू इच्छिते की, माझा कर्नाटकात जन्म झाल्यामुळे सीमन मला त्रास देत आहे. एक स्त्री या नात्याने मी सर्वोतोपरी लढण्याचा प्रयत्न केला. पण आता हा दबाव मला सहन होत नाही. मी पिल्लई कम्युनिटीची आहे. एलटीटीईचा नेता प्रभाकरणही याच कम्युनिटीचा होता. आज सीमन जे काही आहे ते फक्त प्रभाकरणमुळेच आहे. पण सध्या ते सतत मला त्रास देत आहे.'

व्हिडिओत विजयलक्ष्मीने आरोप केले की, 'तुम्ही माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले. हीच गोष्ट फार त्रास देणारी आहे. या सर्व गोष्टींचा सामना केल्यानंतर मी आता हे पाऊल उचलत आहे. मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छिते की सीमन यांना सोडू नका. त्यांना जामीन मिळायला नको. माझा मृत्यू सर्वांसाठी अंजन घालणारा असायला हवा. मला कोणाचीही गुलाम होऊन जगायचे नाहीये.'

  • विजयालक्ष्मीने यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न

वृत्तानुसार विजयालक्ष्मी काही वर्षांपासून चेन्नईमध्ये राहत आहे. 2006 मध्येही तिने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिने एका सहायक दिग्दर्शकाच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले होते. या व्यक्तीने तिच्याशी लग्न करण्यासाठी तिला त्रास द्यायला सुरुवात केली होती. याचवर्षी तिच्या वडिलांचे निधन झाले होते.

विजयालक्ष्मीने 2008 मध्ये आर. माधवनसोबत'वाज्तुगल' (Vaazhthugal), 2003 मध्ये सत्यराजसोबत 'रामचंद्र' या चित्रपटांत काम केले होते. 2000 मध्ये ती कन्नडमध्ये अभिनेता मोहनलालसोबत 'देवदूत' या चित्रपटात झळकली होती. तिचा शेवटचा तामिळ चित्रपट 'मीसाया मुरुक्कु' 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर कन्नडमध्ये ती 'फाईट' (2018) या चित्रपटात शेवटची दिसली होती.