आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मास्टर’ स्ट्रोक:तामिळ चित्रपटाची पहिल्याच दिवशी तामिळनाडूत 23 कोटी तर देशात 40 कोटी कमाई, बॉलीवूडच्याही आशा पल्लवित

चेन्नई/मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाकाळात प्रथमच प्रतिसाद, बॉलीवूड चित्रपटही सिनेमागृहात प्रदर्शित करण्याची मागणी

कोरोनामुळे अनेक राज्यांत चित्रपटगृहे बंद असल्याचे किंवा निम्म्या प्रेक्षकसंख्येने ती सुरू असल्याने बॉलीवूडमधील निर्माते चित्रपट प्रदर्शित करणे टाळत आहेेत. तामिळनाडूतही निम्म्या प्रेक्षकसंख्येवर चित्रपटगृहे सुरू असली तामिळ अभिनेता थलपती विजयचा चित्रपट “मास्टर’ केवळ प्रदर्शितच झाला असे नव्हे तर त्याने पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम केला.

‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या अहवालानुसार, चित्रपटाने केवळ तामिळनाडूत पहिल्या दिवशी २३ कोटी कमावले. तर, देशभर सुमारे ४० कोटींचा व्यवसाय केला. परदेशातही पहिल्या दिवशी चांगली कमाई झाली. केवळ ऑस्ट्रेलियात पहिल्या दिवशी २.४८ लाख डॉलर (१.८२ कोटी) कमाई झाली आहे. तेथे पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा दाक्षिणात्य चित्रपट ठरला. हिंदी, तेलुगू व कानडीतही चित्रपट डब करण्यात आला असून कोरोनाकाळातील हा प्रतिसाद चित्रपट उद्योगाचा उत्साह वाढवणारा ठरला. सामान्य परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी तो एक ठरला असता. तरीही, आठवडाअखेरपर्यंत ही कमाई १०० कोटींपर्यंत जाऊ शकते.

शुक्रवारच्या रिलीजचा ट्रेंडही बदलला : ‘मास्टर’च्या निर्मात्यांनी शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंडही माेडला. बुधवार, १३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. याचा चांगला फायदा झाला. कारण, अनेक भागांत १३ ते १५ जानेवारीदरम्यान लोहडी, मकरसंक्रांत, पोंगलसारख्या सणाचा उत्साह होता. त्यानंतर १६ जानेवारीला शनिवार व १७ला रविवार आहे. यामुळे चित्रपट आणखी कमाई करेल. तिकीट बुकिंग साइट ‘बुक माय शो’चे आशिष सक्सेना म्हणाले, ‘मास्टर’ हा चित्रपट लॉकडाऊननंतर तिकीट खिडकीवर गर्दी खेचणारा पहिला चित्रपट आहे, यात वाद नाही. १ लाखाहून अधिक अॅडव्हान्स बुकिंग आज आमच्याकडे आहे. निर्माते गिरीश जोहर म्हणाले, बॉक्स ऑफिसला यामुळे दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील अनेक चित्रपटगृहांचे मालक असलेले अक्षय राठी “मास्टर’च्या यशामुळे भारावले आहेत. ते म्हणाले, ‘आता चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित करावेत, अशी मागणी निर्मात्यांकडे करण्यात आली आहे.’ विशेषत: सलमान खानने “राधे’ हा चित्रपट ईदच्या निमित्ताने सिनेमागृहांत प्रदर्शित करावा, असा आग्रह आहे. सूर्यवंशी, ८३ आणि ‘शमशेरा’च्या निर्मात्यांकडेही मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...