आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तांडव' वादाचा परिणाम:वेब सीरिजच्या वादामुळे अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा महत्त्वाचा निर्णय, मनोज बाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन 2'चे ट्रेलर लाँचिंग टाकले लांबणीवर

अमित कर्ण2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोज बाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन 2'या वेब सीरिजचा ट्रेलर मंगळवारी लाँच होणार होता.

'तांडव' या वेब सीरिजच्या वादाचा परिणाम मनोज बाजपेयीच्या आगामी 'द फॅमिली मॅन 2' वर झाला आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर मंगळवारी लाँच होणार होता. परंतु मेकर्स आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने ते लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शोशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, 'मंगळवारी या कार्यक्रमासंदर्भात पत्रकारांसोबत एक व्हर्च्युअल पत्रकार परिषद होणार होती. 'तांडव' हा अ‍ॅमेझॉन प्राइमचा कार्यक्रम असल्याने या पत्रकार परिषदेत त्यासंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारले जाण्याची शक्यता होती. परंतु अद्याप निर्मात्यांकडे कोणतेही ठोस उत्तर तयार नाहीये. त्यामुळे ट्रेलर लाँच कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.'

अली अब्बास जफर यांनी अपर्णा पुरोहित यांच्याशी केली बातचीत
वादानंतर तांडवचे निर्माते अली अब्बास जफर आणि अ‍ॅमेझॉन प्राइम ओरिजिनल कंटेंट प्रमुख अपर्णा पुरोहित यांच्यात बरीच बातचीत झाली आहे. सोमवारी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या जनसंपर्क प्रमुख सोनिया हुरिया यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिका-यांशी फोनवरुन चर्चा केली. तथापि, या चर्चेतून काय निष्कर्ष निघाले ते अद्याप समोर आलेले नाही.

प्राइम व्हिडिओसमोर निवेदनात काय सांगावे, याचे संकट
अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओसमोर निवेदन जारी करुन काय सांगावे, हे संकट उभे ठाकले आहे. खरं तर पहिल्यांदाच या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचा एखादा शो वादात सापडला असे नाहीये. यापूर्वीही गेल्यावर्षी मिर्झापूर 2 वर शहराची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप लागला होता. त्यानंतर 'पाताल लोक' या वेब सीरिजवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता. पण तेव्हा हा वाद फक्त दोन ते तीन दिवसांचा होता. निर्मात्यांना संबंधित सीनदेखील बदलण्याची गरज पडली नव्हती. पण यावेळी वादाला तोंड फुटले आहे.

आतापर्यंत वेब सीरिजसंदर्भात काय काय घडले?

  • 15 जानेवारीला सैफ अली खान, डिंपल कपाडिया, मोहम्मद झिशान अयूब स्टारर 'तांडव' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आणि त्यातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात एका नाटकात मोहम्मद झिशान अयूब भगवान शंकराची भूमिका वठवताना दिसला. त्याच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद होते. सोशल मीडिया यूजर्सनी यावर हिंदू धर्म आणि देवी-देवतांचा अपमान म्हणून टीका केली. आणि वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी पुढे येऊ लागली.
  • 16 जानेवारीला कपिल मिश्रा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली.
  • 17 जानेवारी रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी हिंदू देवतांचा अपमान हा बॉलिवूड जिहाद असल्याचे म्हटले. आणि कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.
  • 17 जानेवारी रोजी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबईतील घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये सीरिजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली. आणि मोर्चाही काढला.
  • वाढता वाद बघता मुंबईत सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस तैनात करण्यात आले. शूटिंगच्या संदर्भात सैफ सध्या शहराबाहेर आहे. करीना कपूर आणि तिचा मुलगा तैमूर घरी आहेत.
  • वृत्तसंस्था सूत्रांच्या माहितीनुसार मंत्रालयाने अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या अधिका-यांना समन्स बजावले आहे. भाजप नेते मनोज कोटक यांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना एक पत्र लिहिले. त्यांनी लिहिले- तांडवच्या निर्मात्यांनी हिंदू देवी-देवतांची निंदा केली आणि हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत.
  • 17 जानेवारी रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम इंडियाच्या ओरिजिनल कंटेंट हेड अपर्णा पुरोहित, मालिका निर्माते अली अब्बास जफर आणि हिमांशु कृष्णा मिश्रा आणि लेखक गौरव सोलंकी यांच्याविरोधात लखनौच्या हजरतगंज कोतवाली येथे एफआयआर दाखल करण्यात आला. हजरतगंज पोलिस ठाण्यातील चार सदस्यांची टीम चौकशीसाठी मुंबईकडे रवाना झाली.
  • 18 जानेवारी रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ओटीटी प्लॅटफॉर्मवरून 'तांडव' हटवण्याची मागणी केली.
बातम्या आणखी आहेत...