आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोव्यात नवीन वर्ष साजरे करून परतलेल्या तनिषा मुखर्जीने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात एका फोटोत तिने पायात जोडवी घातलेली दिसली. त्यानंतर तनिषाने गुपचुप लग्न उरकल्याची चर्चा रंगू लागली. मात्र आता या प्रकरणावर अभिनेत्रीने मौन तोडले आहे. तनिषाने सांगितल्यानुसार, तिला तिचा मिस्टर राईट अद्याप सापडलेला नसून ती अविवाहित आहे. तिला जोडवी घालायला आवडतं, म्हणूनच ती घालते.
माझ्या फॅशन सेन्सबद्दल मी सगळ्यांना का सांगू?
एका मुलाखतीत तनिषाने पायात जोडवी घालण्यामागील कारण सांगितले आहे. ती म्हणते, "मला पायात जोडवी घालायला आवडतं. म्हणून मी एक फोटो काढला आणि पोस्ट केला. बाकी काही नाही. मला खरंच माझ्या फॅशनबद्दल लोकांना सांगण्याची गरज आहे का?"
मी अविवाहित असल्याचा आनंद आहे
लग्नाबद्दल तनिषा म्हणाली, "नक्कीच प्रत्येकजण याचा विचार करतो. जोपर्यंत मला लग्नासाठी ड्रीम मॅन सापडत नाही तोपर्यंत माझे ड्रीम वेडिंग होणार नाही. मी सध्या कोणाचेही हृदय तोडत नाहीये. पण मी जेव्हा लग्न करेल तेव्हा संपूर्ण जगाला सांगेल. हे एक भव्य लग्न असेल. संपूर्ण जगाला माहित आहे की मी अविवाहित आहे. हे अस्पष्ट ठेवण्याची गरज नाही. आणि मी अविवाहित असल्याचा मला आनंद आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.