आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातनिषा मुखर्जी अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने नवीन वर्षातील काही फोटो शेअर केले होते, जे सध्या बरेच व्हायरल होत आहेत. तनिषाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिने पायात जोडवी घातलेली दिसत आहेत. तनिषाने शेअर केलेल्या फोटोमुळे ती विवाह बंधनात अडकल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
लॉकडाउनमध्ये शिकलेले कौशल्य सांगितले
तनिषाने पोस्टमध्ये लिहिले – 'माझ्या पायाच्या बोटांवर वाळू आणि माझ्या आत्म्यात समुद्र! मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. प्रत्येक क्षण जगत आहे. मी स्वतः बनवलेला क्रोशेट टॉप घालून नवीन वर्षाची सुरुवात केली! लॉकडाउनमध्ये मी ब-याच नवीन गोष्टी शिकले. आणि मर्यादित आयुष्यातील सर्व अस्वस्थता या सुंदर सर्जनशील उर्जेमध्ये बदलली!', अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.
नेटक-यांनी लग्नाबाबत विचारले प्रश्न
तनिषाला आता नेटकरी तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारत आहेत. एका यूजरने विचारले - तू विवाहित आहेस का? एका यूजरने लिहिले – तू गुपचुप लग्न केले का?
6 महिन्यांपूर्वी म्हणाली होती की लग्नाची गरज नाही
43 वर्षीय तनिषा मुखर्जी म्हणाली होती, "मला मूल नाही आणि या सर्व गोष्टी माझ्या मनात घोळत होत्या. शेवटी मला मार्गदर्शन मिळाले आणि मी वयाच्या 39 व्या वर्षी माझे एग्जफ्रीज केले होते. तनिषा सांगितले होते की, तिला एक मूल हवे आहे पण तेव्हा जेव्हा तिला तिच्या मुलाचा बाप होण्यासाठी योग्य व्यक्ती सापडेल.
तनिषाने 2003 मध्ये 'Sssshh...'मधून बॉलिवूडमध्ये केले होते पदार्पण
तनिषाने 2003 मध्ये रिलीज झालेल्या 'Sssshh...'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने 'नील अँड निक्की', 'सरकार', 'टँगो चार्ली' आणि 'वन टू थ्री' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 2013 मध्ये, तिने बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या 7 व्या सीझनमध्ये भाग घेतला होता. खतरों के खिलाडीच्या 7व्या सीझनची ती स्पर्धक होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.