आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाखत:रिक्रिएटेड गाण्यांचे महारथी तनिष्क बागची आणि नेहा कक्कर म्हणाले - 'रिक्रिएटेड गाण्यांच्या वेडापायी करतो त्यांची मेलोडी'

अमित कर्ण. मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुनी गाणी ऐकून आजही लोक त्यावर थिरकतात.

मागील 10 वर्षांत 60 ते 70 टक्के चित्रपटात रिक्रिएटेड गाणी आहेत; का बनवतात अशी गाणी आणि कशी होतात लोकप्रिय याची माहिती रिक्रिएटेड गाण्यांचे महारथी तनिष्क बागची आणि नेहा कक्कर यांनी दिली आहे.  

  • रिक्रिएटेड गाण्यात कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते?

ब-याच लोकांना असे वाटते की या सर्व गाण्यांच्या कल्पना संगीतकारांच्या असतात, परंतु ही सर्व निर्मात्यांकडून दिली जातात. ते जी गाणी आम्हाला सांगतात त्याला आम्ही रिक्रिएट करतो. निर्माते आम्हाला चार पाच गाणी देतात त्यातील आम्ही एक निवडतो. जी गाणी त्या काळात लोकप्रिय झाली नाहीत त्यांची चांगली मेलोडी व्हावी तीच गाणी निवडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. शेवटी या गाण्यांना नवीन सुरांचा तडका देऊन आम्ही रिक्रिएटेड गाण्यांची निर्मिती करतो.  

  • गाण्यांना रिक्रिएट करताना कसे जोडले जातात?

‘मुकाबला-मुकाबला’ ही दोन्ही मूळ आणि रिक्रिएटेड गाणी प्रभूदेवा यांच्यावर चित्रीत केली होती. नवीन गाण्यात चित्रपटातील एका प्रसंगात, नृत्याची स्पर्धा दाखवली आहे, यात आम्ही नवीन व्हर्जनमध्ये त्या गाण्याला ट्रिब्यूट दिले. यामुळे चित्रपट आणि त्या प्रसंगाशी प्रेक्षक जोडल्या गेलेत. आम्ही या गाण्यात संपूर्ण लॅटिन म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा वापर केला होता.

  • जास्तीत जास्त रिक्रिएटेड गाण्यांमध्ये जर एकाच गायकाचा आवाज असेल तर त्यात नावीन्य कसे आणले जाते?

जर एखाद्या संगीतकार एकाच गायकाकडून पुन्हा पुन्हा गाणी गाऊन घेत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असते. एखाद्या गायकाचा आवाज प्रत्येक कलाकाराच्या आवाजाशी जुळत असेल तर त्याच्याकडूनच गाऊन घेण्यात काहीच चूक नाही. प्रत्येक गाण्यात नावीन्य तर संगीतामुळेच येते. 

  • तरुणांना अशी गाणी का आवडतात?

जुनी गाणी ऐकून आजही लोक त्यावर थिरकतात. जसे ‘सिंबा’ चित्रपटात ‘आँख मारे’ या रिक्रिएटेड गाण्याला वापरले होते. जुनी गाणी नव्या सुरात आणि नावीन्यपूर्ण संगीतात आल्यामुळे त्याची नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू वाढते आणि तरुणांना अशा गाणी आवडायला लागतात. 

  • 2019-20 चे रिक्रेएटेड साँग्स
चित्रपट        गाणी     यू-ट्यूब व्ह्यूज
बागी 2    एक दो तीन119 दशलक्ष व्ह्यूज
सिंबा    आंख मारे721 दशलक्ष व्ह्यूज
लुका छुपी    कोका कोला438 दशलक्ष व्ह्यूज
बद्रीनाथ की दुल्हनिया  तम्मा तम्मा299 दशलक्ष व्ह्यूज
बटला हाउसओ साकी389 दशलक्ष व्ह्यूज
रेडमेरे रश्के कमर194 दशलक्ष व्ह्यूज
ओके जानूहम्मा हम्मा270 दशलक्ष व्ह्यूज 
बातम्या आणखी आहेत...