आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा या आज आपला 77 वा (23 सप्टेंबर 1943) वाढदिवस साजरा करत आहेत. तनुजा यांचा जन्म एका चित्रपटसृष्टीशी निगडीत कुटुंबात झाला. त्यांच्या आई, पती आणि मुली सिनेसृष्टीत कार्यरत आहेत.
तनुजा यांना आजही ‘बहारें फिर आएंगी’ (1966), ‘ज्वेल थीफ’, ‘हाथी मेरे साथी’ (1971) आणि ‘अनुभव’ (1971) या सिनेमांसाठी ओळखले जाते. हिंदीव्यतिरिक्त त्यांनी मराठी, बंगाली आणि गुजराती सिनेमांमध्येही आपले टॅलेंट दाखवले आहे.
खासगी आयुष्य
समर्थ कुटुंबात जन्मलेल्या तनुजा यांचे पती दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर होते. तर आई शोभना समर्थ या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तनुजाच्या बालपणी त्यांचे आईवडील विभक्त झाले होते. तनुजा यांना त्यांची आई शोभना यांनी सिनेसृष्टीत लाँच केले होते. तनुजा यांच्या पहिल्या सिनेमाची निर्मिती शोभना समर्थ यांनी केली होती. तनुजा यांची बहीण नूतन यादेखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.
लग्न आणि मुली
तनुजा आणि शोमू मुखर्जी (दिग्दर्शक-निर्माते) यांची पहिली भेट ‘एक बार मुस्कुरा दो’ (1972) या सिनेमाच्या सेटवर झाली होती. एका वर्षांच्या डेटिंगनंतर 1973 मध्ये दोघांनी लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. काजोल आणि तनिषा ही त्यांची नावे आहेत.
काजोल बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आहे. तिचे लग्न अभिनेता अजय देवगणसोबत झाले आहे. तनुजा यांची धाकटी मुलगी तनिषाने काही निवडक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. तनुजा लग्नाच्या काही वर्षांतच पती शोमू यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या. मात्र त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. एप्रिल 2008 मध्ये दीर्घ आजारामुळे शोमू मुखर्जी यांचे निधन झाले.
तनुजा यांचे फिल्मी करिअर
तनुजा यांनी 1950 मध्ये 'हमारी बेटी' या सिनेमाद्वारे बालकलाकाराच्या रुपात फिल्मी करिअरला सुरुवात केली. मुख्य अभिनेत्री म्हणून 1960मध्ये रिलीज झालेला 'छबीली' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. मात्र 1961मध्ये रिलीज झालेल्या 'हमारी याद आएगी' या सिनेमाद्वारे त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली.
बहिणीसोबत झाली नेहमी तुलना
स्वतःला यशस्वी अभिनेत्री म्हणून सिद्ध केल्यानंतरसुद्धा तनुजा यांची तुलना नेहमी बहीण नूतनसोबत होत राहिली. करिअरच्या काही वर्षांत वहिनी आणि सहायक अभिनेत्रींच्या भूमिका केल्यामुळे तनुजा यांचे फिल्मी करिअर हवे तसे यशस्वी होऊ शकले नाही.
प्रमुख सिनेमे
छबीली (1960), बहारें फिर आएंगी (1966), ज्वेल थीफ (1967), हाथी मेरे साथी (1971), मेरे जीवन साथी (1972), अमीर-गरीब (1974), याराना (1981), सोनी महिवाल (1985), रखवाला (1989), साथिया (2002), खाकी (2004), सन ऑफ सरदार (2012)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.