आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनुश्रीचे कमबॅक:10 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे 36 वर्षीय तनुश्री दत्ता, 15 किलो वजन केले कमी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तनुश्रीने इंस्टाग्रामवर तिच्या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे.

2018 मध्ये बॉलिवूडमध्ये मीटू चळवळ सुरु करणारी तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2010 पासून चित्रपटांपासून दूर असलेली तनुश्री आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून तिने हा खुलासा केला आहे. तनुश्रीने इंस्टाग्रामवर तिच्या नवीन लूकचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे वजन पूर्वीपेक्षा खूप कमी दिसत आहे.

कमबॅकसाठी कमी केलेले वजन

तनुश्रीने इंस्टाग्रामवर आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "मी गेल्या काही वर्षांपासून चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांमुळे सिनेसृष्टीपासून दूर होते. परंतु आता मी माझा निर्णय बदलला आहे. आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय मी घेतला आहे." अशा आशयाची पोस्ट तनुश्रीने शेअर केली आहे.

'मला चित्रपट आणि वेब सीरिजच्या काही चांगल्या ऑफर्स येत आहेत. सध्या मी 3 मोठ्या साउथ फिल्म मॅनेजर्स आणि मुंबईतील 12 कास्टिंग ऑफिसच्या संपर्कात आहे जे बिग बजेट साऊथ प्रोजेक्ट्स आणि चित्रपटांसाठी मला मदत करतील', असेही तनुश्रीने सांगितले.

'इंडस्ट्रीतील काही मोठे लोकही शांतपणे मला पाठीमागून पाठिंबा देत आहेत, कारण त्यांना सत्य माहित आहे आणि ते माझे हितचिंतक आहेत. मुख्य भूमिकेविषयी काही प्रमुख प्रॉडक्शन हाऊसशी बोलणी सुरु आहेत. सध्या कोरोनामुळे शूटिंगच्या तारखांबाबत अनिश्चितता आहे, त्यामुळे आत्ता मी कोणतीही निश्चित घोषणा करु शकत नाहीये', असेही ती म्हणाली आहे.

पुढे तनुश्रीने सांगितले, 'मी नुकतीच एका ब्युटी ब्रँडची जाहिरात शूट केली आणि मी कामावर परत आल्याचे जाहीर केले. मी छान दिसतेय कारण मी 15 किलो वजन कमी केले आहे आणि इंडस्ट्रीत चर्चा आहे की मी अभिनय जगात परतत आहे.'

नोव्हेंबर 2018 मध्ये नाना पाटेकरांवर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप

नोव्हेंबर 2018 मध्ये तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर 2008 मध्ये आलेल्या 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन केल्याचा आरोप लावला होता. यानंतर 'हाऊसफुल 3' चित्रपटासह अनेक प्रोजेक्ट नाना पाटेकरांच्या हातातून निघून गेले. मुंबई पोलिसांनीही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. परंतु जून 2019 मध्ये त्यांना क्लीन चिट देण्यात आली. गुन्हा नोंदवल्यानंतर तनुश्री अमेरिकेत गेली होती आणि दहा वर्षे तिथे राहिली होती.

36 वर्षीय तनुश्रीने 'आशिक बनाया आपने', 'हॉर्न ओके प्लीज', 'ढोल' या चित्रपटांमध्ये काम केले. तिचा शेवटचा चित्रपट 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2010 मध्ये आलेला 'अपार्टमेंट' हा होता.

बातम्या आणखी आहेत...