आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:मुंबई पोलिस बॉलिवूडपेक्षाही वाईट आहे, त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवता येत नाही - तनुश्री दत्ता

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री तनुश्री दत्ताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवीन वळण येत आहे. या दरम्यान बॉलिवूडमधील घराणेशाही, गटबाजी असे अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांसह बिहार पोलिस देखील तपास करत असल्याचे ऐकायला मिळत आहे. याच दरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्ताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिने ‘मुंबई पोलिसांवर विश्वास नाही’, असे म्हटले आहे.

'न्याय निवाडा करण्याच्या बाबतीत मुंबई पोलिसांवर अजिबात विश्वास ठेवता येऊ शकत नाही. ते अशी प्रकरणे लवकर मार्गी लावण्यासाठी कायम घाई करतात. अनेक वेळा त्यांना आरोपींची नावे माहीत असतात आणि अशा प्रकरणात त्यांना राजकीय नेत्यांचीही साथ मिळते', असे तनुश्री म्हणाली आहे.

पुढे ती म्हणते, चित्रपटाच्या सेटवर माझ्यासोबत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी पाच महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशी झालीच नाही. उलटपक्षी आमचीच अनेकदा चौकशी झाली. पुरावे आणि साक्षीदार सादर करुन देखील आम्हाला न्याय मिळाला नाही. कदाचित सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जे खरे दोषी आहेत तेच पोलिसांना फोन करत असतील. तेच पोलिसांना सांगत असतील की त्याच्या प्रेयसीला या प्रकरणी अडकवा, त्याच्या मित्रांना दोषी धरा त्यामुळे यांची नावे आपोआप या केसमधून वेगळी होती. हे सगळं पाहून खरंच फार संताप होतो, असे तनुश्री म्हणाली आहे.

दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. मात्र मुंबई पोलिस बिहार पोलिसांना आवश्यत ते सहकार्य करत असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांना सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाला असून तो पुन्हा मिळवणे शक्य नाही असे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...