आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हॅपी बर्थडे तापसी पन्नू:सॉफ्टवेअर इंजिनिअर ते मिस इंडिया, आज ठरली दिग्दर्शकांची पहिली पसंत; म्हणते - कोणत्याही सेलिब्रिटीला डेट करणार नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • तापसीने वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत.

'पिंक', 'मुल्क', 'बदला' आणि ‘थप्पड'सारख्या चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री तापसी पन्नू आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करणार आहे. चला तर मग जाणून घेऊ तापसीचा चित्रपटसृष्टीतला प्रवास, वैयक्तिक आयुष्य आणि आवडीनिवडीबद्दल...

1 ऑगस्ट 1987 रोजी दिल्लीत जन्मलेल्या तापसीने आपले शिक्षण दिल्लीत घेतलेे. त्यानंतर गुरू तेगबहादूर इन्स्टिट्यूटमधून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर तापसीने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणूनही काम केले. व्ही चॅनलच्या टॅलेंट शो “गॉट गॉर्जियस’मध्ये निवड झाल्यानंतर तिने फुलटाइम मॉडेलिंग सुरू केले. अनेक प्रिंट जाहिराती आणि टीव्हींच्या जाहिरातींसोबतच तापसीने 2008 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत ‘मिस फ्रेश’ फेसचा किताब जिंकला. 2010नंतर अभिनय क्षेत्रात काम करायचे ठरवले.

 • तापसीने सांगितल्या आठवणी : रोज कणीस खायला मागत होती पाच रुपये

माझे बालपण दिल्लीत गेले. माझ्या कुटुंबात आई-वडील आणि माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान एक बहीण आहे. आई ही गृहिणी आणि वडील रिअल इस्टेट कंपनीत काम करतात. अभ्यास हा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यांनी बी. टेक.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्यासारखाच मीदेखील अभ्यास करायचे. त्यांना माझ्या अभ्यासाचे कधीच टेन्शन नव्हते. न सांगताच मी अभ्यास पूर्ण करायचे. वर्गात नेहमीच पहिल्या पाचमध्ये असायचे. अभ्यासासोबतच दंगा मस्तीही करायचे. मी घरात कमी आणि बाहेर जास्त फिरायचे. खेळताना एकदा इतक्या जोरात पडले होते की, माझ्या गुडघ्याला जखम झाली होती. त्यामुळे मी शाळेतल्या खेळण्याच्या स्पर्धेत भाग घेऊ शकले नव्हते. याचा मला नेहमीच पश्चात्ताप होतो, कारण मी शाळेतल्या स्पर्धेत नेहमीच पहिला क्रमांक पटकावलाय. मला लहानपणापासून कधीच पॉकेटमनी मिळाला नाही. माझ्या गरजेच्या वस्तू मला घरचे आणून द्यायचे. कणीस खायला मला पाच रुपये दिले जायचे. माझ्या बालपणीच्या आठवणींवर एक पुस्तक लिहू शकते इतक्या आठवणी आहेत.

 • तापसीबद्दल तिच्या पालकांची मते वेगवेगळी

तापसीची आई तिचे सगळे चित्रपट पाहते. हिंदीच नाही तर तामिळ-तेलुगू चित्रपटही थिएटरमध्ये जाऊन बघते. पण तिच्या आईला या भाषा काहीच कळत नाहीत. तापसीचा एखादा परफॉर्मन्स खराब झाला असला तरी तिच्या आईला तो चांगला वाटतो. पण याबाबतीत तिच्या वडिलांचे मत एकदम विरोधी आहे. ते सिनेमागृहात सहसा चित्रपट बघायला जात नाहीत. तापसीचा सिनेमा त्यांना आवडला तरीही ते फक्त ‘गुड’ अशी प्रतिक्रिया देतात. इतकेच नाही तर ती १२वीत असताता तिला ९० टक्के मार्क मिळाले होते तेव्हाही तिच्या वडिलांना आनंद झाला नव्हता. त्या वेळी ते म्हणाले होते, आणखी थोडे कष्ट केले असते तर एक-दोन टक्के जास्त गुण मिळाले असते.

आईवडील आणि बहिणीसोबत तापसी पन्नू
आईवडील आणि बहिणीसोबत तापसी पन्नू
 • कोणत्याही सेलिब्रिटीला डेट करणार नाही

जानेवारी 2015 मध्ये तापसीला एका मुलाखतीत रिलेशनशिपबद्दल विचारले होते. तेव्हा ती म्हणाली, मी एका साऊथ इंडियनला डेट केले, पण कोणत्याही स्टारला डेट केले नाही. मी तुम्हाला लिहून देते, जेव्हा कधी मी रिलेशनशिपमध्ये असेन तेव्हा त्यात मीच एकमात्र सेलिब्रिटी असेन. बॅडमिंटन खेळाडू मथायस बो याला तापसी डेट करत असल्याचे बोलले जात होते.

 • शॉट दिल्यानंतर तापसी मॉनिटर चेक करत नाही

तापसी पन्नू स्वतःचे चित्रपट बघते, पण शॉट दिल्यानंतर ती कधीच मॉनिटर चेक करत नाही. “दिव्य मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले, मी माझे चित्रपट बघते, माझेच चित्रपट पाहिले नाही तर मी काय केले कसे कळणार? पण शॉट दिल्यानंतर मी मॉनिटर चेक करत नाही. हे काम मी दिग्दर्शकावर सोडते. कारण मला माझे काम चांगलेच वाटणार. त्यात मला कही चूक दिसणार नाही. मात्र जेव्हा हे काम दिग्दर्शक त्यांच्या नजरेतून पाहतील तेव्हा त्यांना काही जाणवेल, त्यामुळे मी ते दिग्दर्शकावर सोडून देते. मी प्रेक्षकाच्या भूमिकेतून माझे चित्रपट पाहत असते. आतापर्यंत माझे 18-19 चित्रपट पाहिलेत, पण ते चांगले आहे की नाही ते मला समजले नाही.

कारकीर्दीवर एक नजर

 • 2010 मध्ये तापसीची तेलुगू चित्रपट “झुमादी नादम’मधून सुरुवात
 • 2011मध्ये रिलीज झालेला तामिळ चित्रपट “आडुकलम’मधून ओळख मिळाली. याला 58 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सहा पुरस्कार मिळाले.
 • 2013 मध्ये रिलीज झालेला कॉमेडी चित्रपट “चश्मेबद्दूर’ पासून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.
 • 2016 मध्ये रिलीज झालेल्या “पिंक’पासून कमर्शियल यश मिळवले.
 • 2018 पासून आत्तापर्यंत फोर्ब्ज इंडिया 100 सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळवले. 2019 मध्ये रिलीज झालेल्या “सांड की आंख’साठी पहिल्यांदा उत्कृष्ट कलाकार म्हणून फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला.