आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Taapsee Pannu Anurag Kashyap IT Raid Update | Taapsee Pannu Anurag Kashyap Mumbai House Raided By Income Tax Day 2; Latest News And Updates

IT चा बॉलिवूडकडे मोर्चा:अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या घरी सलग दुस-या दिवशी आयकर विभागाची कारवाई सुरु; ऑफिसमधून 3 लॅपटॉप आणि 4 संगणक जप्त

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माेदींवर टीका करणाऱ्या अनुराग, तापसी यांच्यासह नामवंतांवर आयकर विभागाचे छापे

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माते अनुराग कश्यप, विकास बहल, विक्रमादित्य मोटवाणे आणि मधु मंटेना यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाचे धाडससत्र सुरू आहे. त्यांच्यावर कर चुकल्याचा संशय आहे. तापसी आणि अनुराग यांच्या घरांबरोबरच ऑफिसमध्येही छापे पडले आहेत. आयकर विभागाच्या अधिका-यांनी त्यांच्या ऑफिसमधून 3 लॅपटॉप आणि 4 संगणक जप्त केले आहेत. सध्या, तापसीची पीआर कंपनी KRI एंटरटेन्मेंटच्या ऑफिसवरही छापेमारी सुरू आहे.

  • पुढील 3 दिवस कारवाईचे सत्र सुरु राहू शकते

सूत्रांच्या माहितीनुसार, KRI एंटरटेन्मेंट आणि फँटम फिल्म्स यांच्यात मोठ्या प्रमाणात पैशांच्या व्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत. या प्रकरणात फँटम फिल्म्स, रिलायन्स एंटरटेन्मेंट, क्वान टॅलेंट हंट कंपनी आणि एक्सीड कंपनीच्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हे कारवाई सत्र पुढील तीन दिवस चालू शकते.

काही रिपोर्ट्सनुसार, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांची पुण्यात चौकशी केली जात आहे. दोघांनाही येथील हॉटेलच्या खोलीत ठेवण्यात आल्याचे समजते. तथापि, अद्याप याची खातरजमा झालेली नाही.

  • आयकर विभागाच्या कारवाईवरही राजकारण सुरू झाले, माेदींवर टीका केल्याने झाली कारवाई?

आयकर विभागाच्या या कारवाईबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'याला म्हणतात तालावर नाचवणे - आयटी विभाग-ईडी-सीबीआयमार्फत केंद्र सरकार हे करते,' अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

ही तर मुस्कटदाबीच : राष्ट्रवादी
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, ही कारवाई मोदी सरकारविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांवर झाली आहे. ते लोकांचा आवाज दाबू पाहत आहेत. तसेच मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकार महत्त्वाची तथ्ये दाबू पाहत आहे.

- राहुल गांधी ही टीका यासाठी केली होती, कारण तापसी आणि अनुराग वेळोवेळी सरकारविरोधात बोलत होते. त्यांनी नव्या कृषी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनालाही पाठिंबा दिलेला आहे. गतवर्षी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध जेएनयू व शाहीन बाग आंदोलनातही अनुराग कश्यप सहभागी होते. शेतकरी आंदोलनात विदेशी व्यक्तींच्या वक्तव्यांवरून वाद झाला होता. त्यावर तापसी म्हणाली होती, ‘एखादी टिप्पणी तुमची एकता खंडित करत असेल, एखादा विनोद तुमचा विश्वास मोडत असेल, एखादा शो तुमच्या धार्मिक आस्थेला ठेच पोहोचवत असेल तर तुम्हाला मूल्यव्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करावे लागेल.'

  • क्वान या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची 4 खाती फ्रीझ

निर्माता मधु मंटेना यांच्या मुंबईतील क्वीनबीच इमारतीवरही आयकर विभागाच्या 6 अधिका-यांनी छापा टाकून कारवाई केली. दरम्यान, मधु मंटेना यांच्या अंधेरी वेस्ट स्थित क्वान टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीत आठ अधिका-यांच्या पथकाने छापा टाकला आहे. क्वान कंपनीची चार खाती फ्रीझ करण्यात आली आहेत.

यापूर्वी बुधवारी आयकर विभागाने सुमारे 30 ठिकाणी कारवाई केली. मुंबईच्या लोखंडवाला, अंधेरी, वांद्रे आणि पुण्यासह अनेक भागात बुधवारी सकाळी आठ ते नऊ या दरम्यान छापा टाकण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी आयकर अधिका-यांचे येणेजाणे उशीरा रात्रीपर्यंत सुरु होते.

बुधवारी छापेमारी दरम्यान आयकर अधिका-यांच्या पथकाने अनुराग कश्यप यांच्या घरी ब-याच वेळा भेट दिली.
बुधवारी छापेमारी दरम्यान आयकर अधिका-यांच्या पथकाने अनुराग कश्यप यांच्या घरी ब-याच वेळा भेट दिली.

संपूर्ण कारवाई एकमेकाशी संलग्न

फँटम फिल्म’ आणि 'क्वान' या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचे वितरण करण्याचे काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधु मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी 2018 मध्ये बंद करण्यात आली होती.

एका महिन्यापूर्वी मंटेना यांनी फँटम फिल्म्समध्ये 50% भागीदारी विकत घेतली. त्यांनी या प्रॉडक्शन हाऊसमध्ये अनुराग कश्यप, विकास बहल आणि विक्रमादित्य मोटवाणे यांचे एकूण 37.5% शेअर्स खरेदी केले. आधीपासूनच त्यांचा या प्रॉडक्शन हाऊसमध्ये 12.5% वाटा ​​होता. अशाप्रकारे मंटेना आता 50% चे भागीदार झाले आहे. या प्रॉडक्शन हाऊसमधील उर्वरित 50% वाटा अनिल अंबानी ग्रुपच्या रिलायन्स एंटरटेनमेंटच्या मालकीचा आहे.

फँटम फिल्म्सने कोणते चित्रपट केले?
फँटम फिल्म्स कंपनीचा पहिला चित्रपट 'लुटेरा' 2013 मध्ये आला होता. त्यानंतर या बॅनरखाली हंसी तो फंसी, क्वीन, अगली, एनएच -10, हंटर, मुंबई वेलवेट, मसान, शानदार, उडता पंजाब, रमण राघव -2, राँग साइड राजू, बॉक्सर, सुपर 30 आणि धूमकेतू या चित्रपटांची निर्मिती झाली आहे. धूमकेतू हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...