आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग प्रोजेक्ट:तापसी पन्नू स्टारर 'ब्लर'चे नैनीतालमधील शूटिंग शेड्युल पूर्ण, दिग्दर्शक अजय बहल यांनी शेअर केला शूटिंग अनुभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्दर्शक अजय बहल यांनी नैनीतालमध्ये शूट करण्याचा आपला अनुभव शेअर केला आहे.

तापसी पन्नूने मागील महिन्यात आपले प्रोडक्शन हाउस आउटराइडर्स फिल्म्सचे अनावरण केले. त्यानंतर ती अभिनेता गुलशन देवैयासोबत आगामी 'ब्लर' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी नैनीतालला रवाना झाली होती. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय बहल यांनी नैनीतालमध्ये शूट करण्याचा आपला अनुभव शेअर केला आहे.

अजय बहल यांनी सांगितले, "नैनीताल कदाचित भारतातील पर्यटकांनी गजबजलेल्या सर्वात सुंदर जागांपैकी एक आहे. 'ब्लर'च्या स्क्रिप्टला या अशाच लॅंडस्केपची गरज होती आणि आम्ही शूटिंगसाठी मॉल रोड आणि नैनीताल झीलसारख्या सुयोग्य जागा यासाठी निवडल्या होत्या. या दोन्ही जागा स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी गजबजलेल्या असतात आणि तापसीसारख्या लोकप्रिय कलाकारासोबत अशा वास्तविक स्थानांवर शूटिंग करणे खरोखरच आव्हानात्मक असते. मात्र इथल्या स्थानिकांनी संयम बाळगला, शूटिंग संपेपर्यंत सेल्फी घेणे किंवा ऑटोग्राफ घेण्यासाठी वाट पाहिली. मला या शहरातील लोकांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी आमच्या या शूटिंगसाठी याला इतके सुविधाजनक बनवले."

बहल पुढे म्हणाले, ''ब्लरची टीम लोकेशनवर जास्त गर्दी असल्या कारणाने रात्री शूटिंग करत होती. नैनीताल झील आणि मॉल रोडसारख्या स्थानांवर करण्यात आलेले शूटिंग सुंदर प्राकृतिक दृश्यांचे संकेत देतात जे दर्शकांना चित्रपट बघताना नक्कीच जाणवेल.''

चित्रपट 'ब्लर' अजय बहलद्वारे दिग्दर्शित असून तापसी आणि गुलशन देवैया मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.