आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे ब्रेकअप!:परस्पर सामंज्यसाने झाले विभक्त, 4 वर्षांचे रिलेशनशिप संपुष्टात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तारा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड आदर जैन यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. तारा आणि आदरने यांनी कधीही आपल्या प्रेमाची सार्वजनिकरित्या कबुली दिली नसली तरी दोघांनी अनेकदा एकमेकांसोबतचे​​​​​​​ फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, दोघेही कायमचे विभक्त झाल्याच्या बातम्या येत आहेत.

आदर जैन आणि तारा परस्पर संमतीने वेगळे झाले
ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे ब्रेकअप झाले आहे. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेकअपनंतरदेखील ते एकमेकांचे मित्र बनून राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ते दोघेही प्रौढ आहेत आणि ते यानंतरही मित्रच राहतील. एकमेकांची प्रेमाने काळजी घेतील.'

कपूरांच्या फॅमिली फंक्शन्समध्ये तारा गैरहजर
‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून बॉलिवूडमधून पदार्पण करणारी तारा सुतारिया आणि आदर जैन मागील चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आदरच्या मोठ्या भावाच्या लग्नात दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर मात्र दोघे बऱ्याच काळापासून एकत्र दिसले नाहीत. आलिया आणि रणबीरचे लग्न असो किंवा कपूर कुटुंबीयांची ख्रिसमस पार्टी, तारा कुठेच दिसली नाही. तेव्हापासून हे दोघे विभक्त झाल्याच्या चर्चांना उधाण आले.

2018 मध्ये पहिल्यांदा भेटले होते दोघे
आदर आणि तारा एका दिवाळी पार्टीत भेटले होते. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती, त्यानंतर हे जोडपे अनेकदा एकत्र दिसले. जवळपास 4 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आदर आणि ताराने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आदर हा ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांची बहीण रिमा कपूर यांचा मुलगा. या नात्याने तो रणबीर कपूरचा आतेभाऊ आहे.

आदरने 2017 मध्ये ‘कैदी बँड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. तर दुसरीकडे तारा सुतारिया अलीकडेच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तारा लवकरच ‘अपूर्व’ चित्रपटात दिसणार आहे

बातम्या आणखी आहेत...