आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:'टार्झन' फेम अभिनेते जो लारा यांचे विमान अपघातात निधन, पत्नीसह अन्य पाच प्रवाशांचाही झाला मृत्यू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी झाला अपघात

मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी आहे. टार्झन : द एपिक एडव्हेंचर्स या गाजलेल्या टीव्ही मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते जो लारा यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. जो लारा यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि अन्य पाच प्रवाशांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. जो लारा 58 वर्षांचे होते. तर त्यांच्या पत्नी ग्वेन लारा या 66 वर्षांच्या होत्या. अमेरिकेच्या नॅशविले शहराजवळील तलावामध्ये त्यांचे विमान कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शनिवारी झाला अपघात
शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता त्यांच्या विमानाने फ्लोरिडाच्या पाम बीच, टेमिनी विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हा अपघात घडला. लहे विमान नॅशविलच्या दक्षिणेस 19 किलोमीटर असणाऱ्या पर्सी प्रिस्ट तलावामध्ये कोसळले. या विमानात सात जण होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले. शनिवारी रात्रीपर्यंत शोध आणि बचावकार्य सुरु असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा पीडितांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यानंतर रविवारी सापडलेल्या विमानाच्या अवशेषामध्ये मृतदेह सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

2018 मध्ये झाले होते जो लारा यांचे लग्न
जो लारा यांना 90 च्या दशकातील गाजलेल्या टार्झन : द एपिड एडव्हेंचर्स या मालिकेत टार्झनच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळाली होती. जो लारा यांनी 2018 मध्ये ग्वेन एस लारा यांच्याशी लग्न
केले होते.

बातम्या आणखी आहेत...