आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉनी लिव्हर यांच्या मुलीने सांगितले मेक-अप नक्की कसा करायचा:फनी अंदाजात सांगितल्या आयडिया, कॉमेडियन आहे जॅमी

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जॅमीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिचे व्हिडिओ पाहून ती वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत असल्याचे म्हटले जाते. सध्या जॅमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यामध्ये ती फनी अंदाजात चाहत्यांना मजेशीर अंदाजात मेकअप कसा करायचा हे शिकवत आहे. तिने हा व्हिडिओ शेअर केला असून त्याला पसंती मिळतेय.

कोण आहे जॅमी
बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमीने 'सबसे बडा कलाकार' या शोमधून तिच्या कॉमिक स्टाइलने सर्वांना हसवले. 10 सप्टेंबर 1980 ला मुंबईत जन्मलेल्या जॅमीचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. पण नंतर तिने लंडनमधून उच्चशिक्षण घेतले. वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग कम्युनिकशेनची मास्टर डिग्री तिने मिळवली. जॉनी लिव्हर सध्या फारसे कॉमेडी करताना दिसत नाही. मात्र त्यांची कमतरता त्यांची मुलगी भरून काढत आहे.

एका मुलाखतीत जॅमीने सांगितले होते की, ती वडिलांना फार घाबरायची. ते घरी आले की वातावरण अगदी शांत व्हायचे. मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती. शालेय शिक्षणानंतर त्यांनी मला शिकण्यासाठी लंडनला पाठवले. त्याठिकाणी मास्टर डिग्री मिळवल्यानंतर मी तिथेच एका मार्केट रिसर्च एजन्सी 'विजनगेन' मध्ये मार्केटींग एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉबही केला होता. जॅमी आता तिच्या वडिलांसोबत स्टँडअप कॉमेडियन म्हणून स्टेज शो करत असते.

बातम्या आणखी आहेत...