आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रॅमी अवॉर्ड विजेती गायिका टेलर स्विफ्टच्या मांजरीची किंमत जगातील अनेक श्रीमंत लोकांच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. टेलर स्विफ्टची मांजर ऑलिव्हिया बेन्सन जगात सर्वाधिक कमाई करणा-या पाळीव प्राण्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तिची ब्रँड व्हॅल्यू 97 मिलियन डॉलर म्हणजेच 800 कोटी आहे. टेलर स्विफ्टची ही पाळीव मांजर तिच्यासोबत अनेक जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये झळकली आहे.
सोशल मीडियावरही या मांजरीच्या नावाने अनेक फॅन क्लब चालवले जातात. बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांच्या संपत्तीपेक्षा टेलर स्विफ्टच्या मांजराची किंमत अधिक आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. फोर्ब्स 2022 च्या अहवालानुसार, टेलर स्विफ्ट सुमारे 4700 कोटींची मालकीण आहे.
टेलरची मांजर अनेक प्रोफेशनल व्हिडिओमध्ये दिसली आहे
मांजर ऑलिव्हियाने टेलर स्विफ्टसोबत अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. डायट कोक आणि नेड स्निकर्सच्या बिग बजेट जाहिरातीत ही मांजर दिसली आहे. याशिवाय ब्लँक स्पेस सारख्या काही म्युझिक व्हिडिओमध्ये ती झळकली.
ऑलिव्हियाची स्वतःची मर्चेंडाइज लाइन आहे. ऑलिव्हिया व्यतिरिक्त टेलर स्विफ्टकडे आणखी दोन मांजरी आहेत. त्यांची नावे मेरेडिथ ग्रे आणि बेंजामिन बटन अशी आहेत. सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या यादीत मात्र मेरेडिथ किंवा बेंजामिन यांच्या नावाचा उल्लेख नाही.
फोर्ब्स शैलीची यादी जगभरातील सर्व लोकप्रिय पाळीव प्राण्यांसाठी असते असे म्हटले जाते. त्यांच्या इन्स्टाग्राम डेटाच्या माध्यमातून कोणता पाळीव प्राणी किती कमावतो याचा अंदाज बांधला जातो. वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, टेलरची मांजर ऑलिव्हिया वर्षाला 800 कोटींची कमाई करते. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या यादीत ओपरा विन्फ्रेचा श्वान, फॅशन डिझायनर कार्ल लेगेरफेल्डची मांजर यांचाही समावेश आहे.
टेलरचे तिच्या मांजरींवर खूप प्रेम आहे
टेलरला तिच्या मांजरी खूप आवडतात. एकदा ती म्हणाली होती, 'मी माझ्या अपार्टमेंटमध्ये तासनतास बसून त्यांना बघते असते. मला माझ्या मांजरींचे खूप वेड आहे.'
ग्रॅमी पुरस्कार विजेती आहे टेलर
टेलर स्विफ्टचा जन्म 13 डिसेंबर 1989 रोजी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया शहरात झाला. वयाच्या 10 व्या वर्षी तिने गाणी लिहायला आणि गायला सुरुवात केली. तिने वयाच्य 20 व्या वर्षी ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता.
आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत टेलरने 11 ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या इंग्लिश अभिनेता जॉय एव्हलिनला डेट करत आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनाही आहे मांजरीची आवड
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना मांजरीची आवड आहे. यामध्ये आलिया भट्ट, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी आणि शिल्पा शेट्टी यांचा समावेश आहे. या अभिनेत्री अनेकदा त्यांच्या पाळीव मांजरीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.