आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
क्रिकेटपटू विराट कोहलीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका यांच्यासाठी सोशल मीडियावर एक खास नोट लिहिली आहे. यासह विराटने पत्नी आणि मुलीचा एक खास फोटोदेखील शेअर केला आहे. सोबतच त्याने जगातील सर्व महिलांनाही जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त शक्तिशाली असतात
अनुष्का आणि वामिका यांचा फोटो शेअर करत विराटने लिहिले,' एखाद्या बाळाचा जन्म पाहणे म्हणजे अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक अनुभव आहे. ते पाहिल्यानंतर, तुम्हाला एका महिलेचे सामर्थ्य
समजते, आणि परमेश्वराने मातृत्वाचे वरदान स्त्रियांनाच का दिले हे समजते. कारण त्या पुरूषांपेक्षा शक्तिशाली आहेत.'
पुढे विराट लिहिलो, 'माझ्या आयुष्यातील सगळ्यात उत्कट आणि दयाळू महिलेला आणि एक जी मोठी होऊन तिच्या आई सारखी होणार तिला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जगातील सर्व आश्चर्यकारक महिलांनाही महिला दिनाच्या शुभेच्छा,' अशा आशयाची पोस्ट विराटने लिहिली आहे.
अनुष्काने 11 जानेवारी रोजी दिला वामिकाला जन्म
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यावर्षी 11 जानेवारी रोजी वामिकाचे आईबाबा झाले. ही गोड बातमी स्वतः विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यानंतर महिन्याभराने म्हणजे 11 फेब्रुवारी रोजी दोघांनी आपल्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिचे नाव सांगितले होते. चाहत्यांमध्ये विरुष्का या नावाने प्रसिद्ध असलेल्या विराट आणि अनुष्का यांनी आपल्या मुलीचे नाव वामिका ठेवले.
अनुष्काने आपल्या बाळाचा हा पहिला फोटो अविस्मरणीय बनवण्यासाठी त्याला खूप खास कॅप्शन दिले होते. अनुष्का शर्माने लिहिले होते, "आम्ही प्रेम आणि कृतज्ञतेसह एकत्र राहिलो परंतु या छोट्याशा वामिकाने याला नवीन स्तरावर आणले आहे. अश्रू, हसणे, चिंता, आनंद - या भावना आम्ही या क्षणी एकत्र जगलो आहेत. आपल्या सर्वांच्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभारी आहोत," अशा शब्दांत अनुष्काने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या फोटोवर कमेंट करताना विराटने लिहिले होते, 'माझे संपूर्ण जग एका फ्रेममध्ये.'
यापूर्वी माध्यमांना केली होती विनंती
11 जानेवारी रोजी दुपारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अनुष्काने मुलीला जन्म दिला होता. विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी शेअर करत मीडियाने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, असे म्हटले होते. यानंतर दोघांनीही ऑफिशियल स्टेटमेंट जारी करत मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका, अशी विनंती माध्यमांना केली होती.
‘आई-वडील म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो. आमच्या मुलीचे कोणीही फोटो काढू नयेत. कृपया आम्हाला सहकार्य करा’ असे त्यांनी म्हटले होते. पुढे नोटमध्ये विराट आणि अनुष्काने योग्य वेळ येताच मुलीचे फोटो शेअर करु असे म्हटले होते. ‘तुम्हाला हवी असलेली माहिती आम्ही तुम्हाला नक्की देऊ. पण आमच्या मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका. आम्हाला माहित आहे की, तुम्ही समजू शकतात आणि याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत', असे त्यांनी म्हटले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.