आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हनुमान'चा टिझर रिलीज:ट्रोलर्स म्हणाले- जे 'आदिपुरुष' 600 कोटींमध्ये करू शकला नाही, ते 'हनुमान'ने 12 कोटींमध्ये करुन दाखवले

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट निर्माते प्रशांत वर्मा यांनी त्यांचा आगामी चित्रपट 'हनुमान'चा टिझर रिलीज केला आहे. हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात भव्य चित्रपट आहे. टिझर रिलीज होताच हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 12 कोटी रुपये खर्च झाल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. पण टिझर पाहून प्रेक्षकांनी या चित्रपटाचे व्हीएफएक्स अलीकडच्या काळात बनलेल्या अनेक बिग बजेट चित्रपटांपेक्षा चांगले असल्याचे म्हटले आहे. नेटक-यांनी या चित्रपटाच्या टिझरची तुलना आदिपुरुषच्या व्हीएफएक्सशी केली आहे.

हा चित्रपट हनुमानावर आधारित आहे.
नावाप्रमाणेच चित्रपटातील मुख्य पात्र हनुमानापासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. उत्कृष्ट व्हीएफएक्स आणि म्युझिक इफेक्टसह टिझरमध्ये जबरदस्त बॅकग्राउंड स्कोअर बघायला मिलतोय. या चित्रपटाच्या टिझरमध्ये हॉलिवूड चित्रपटाची झलक पाहायला मिळत आहे.

हनुमानचा टिझर पाहून लोकांनी आदिपुरुष या चित्रपटाला केले ट्रोल
टिझर रिलीज होताच हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. टिझर आणि पोस्टर शेअर करत सोशल मीडिया यूजर्सनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. हनुमानचा टिझर पाहून काही सोशल मीडिया यूजर्सनी आदिपुरुषला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. लोकांच्या मते, हनुमान या चित्रपटाचे VFX आदिपुरुषपेक्षा 200% चांगले आहेत.

सोशल मीडिया यूजर्सही आदिपुरुष आणि हनुमान या दोन्ही चित्रपटांच्या बजेटची तुलना करत आहेत. जे काम आदिपुरुषचे निर्माते 600 कोटींमध्ये करू शकले नाहीत, ते काम हनुमानच्या निर्मात्यांनी अवघ्या 12 कोटींमध्ये केल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर कमी बजेट असून तसेच यात कोणताही मोठा सुपरस्टार नसूनही हा चित्रपट बॉलिवूडवर भारी पडू शकतो असे नेटकरी हा टिझर पाहून म्हणत आहेत.

हा चित्रपट 18 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे

प्रशांत वर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 18 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा मुख्य अभिनेता तेजा सज्जा आहे. या चित्रपटाची निर्मिती निरंजन रेड्डी यांनी प्राइमशो एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...