आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनू सूदला देवाचा दर्जा:तेलंगणातील डुब्बा टांडा गावातील लोकांनी उभारले सोनू सूदचे मंदिर, गावकरी म्हणाले - आमच्यासाठी तो देव आहे

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकांसाठी सोनू सूद देवदूत ठरला.

कोरोना व्हायरसच्या काळात अभिनेता सोनू सूद गरजू लोकांच्या मदतीला धावून आला. त्याने आतापर्यंत हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले आहे. स्वखर्चाने सोनू श्रमिकांना त्यांच्या घराच्या दारापर्यंत सोडत आहे. सुरुवातीला त्याने मजुरांना बसने सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर तो ट्रेन आणि गरज पडली तर एअरलिफ्टही करू लागला. लोकांसाठी तो देवदूत ठरला.

सोनूच्या या सर्व कार्यासाठी तेलंगणातील सिद्दीपेट जिल्हातील डुब्बा टांडागावातील लोकांनी सोनू सूदला समर्पित मंदिर बांधले आहे. जिल्हा अधिका-यांच्या मदतीने गावक-यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे.

रविवारी झाले मंदिराचे लोकार्पण
या मंदिराचे रविवारी ग्रामस्थांनी उद्घाटन केले. यावेळी सोनू सूदची आरती करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेषभूषा करून गाणे देखील म्हणले. जिल्हा परिषद सदस्य गिरी कोंडल रेड्डी म्हणाले की, कोरोनो व्हायरसच्या काळात सोनू सूदने जनतेसाठी मोठे काम केले.

ज्यावेळी कोणी मदत करत नव्हते, अशावेळी तो सर्वांच्या मदतीला धावून आला, त्यांच्या या चांगल्या कामामुळे आम्ही त्याला देवाचे स्थान दिले आहे आणि सोनू सूदसाठी एक मंदिर बांधले आहे. याबद्दल रमेश कुमार म्हणाले की, सूदने देशातील 28 राज्यांतील लोकांची मदत केली. आणि कोरोना काळात लॉकडाउनपासून सोनू सूद ज्या प्रकारे लोकांना मदत केली त्यानंतर केवळ भारतातच नाही तर जगानेही त्याला ओळखले आहे.

चिरंजीवीने चित्रपटातील दृश्यात सोनूवर हात उचलण्यास दिला नकार
बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा सोनू सूदला आता अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. तो एका दाक्षिणात्य चित्रपटात मेगास्टार चिरंजीवी यांच्यासोबत काम करणार आहे. पण ऑनस्क्रीन सोनू सूदला मारणे शक्य नाही असे चिरंजीवी यांनी म्हटले आहे. आचार्य या चित्रपटातील एका अॅक्शन सीनमध्ये चिरंजीवी यांनी सोनूला मारणार नसल्याचे म्हटले आहे.

याविषयी सोनूने एका मुलाखती सांगितले, “मी आणि चिरंजीवी सर एक अॅक्शन सीन शूट करत होतो. तेव्हा ते (चिरंजीवी) म्हणाले, ’आता एखाद्या अॅक्शन सीनमध्ये मी तुझ्यावर हात उचलू शकत नाही’ जर त्यांनी मला मारले तर माझे चाहते नाराज होतील असे ते मला म्हणाले” सोनू सूद आणि चिरंजीवी लवकरच ‘आचार्य’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...