आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हनुमान'चा हिरो आहे तरी कोण?:वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी सिनेसृष्टीत पाऊल, आता सुपरहिरो बनून गाजवणार फिल्म इंडस्ट्री

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच 'हनुमान' या तेलुगू सुपरहिरो चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि अल्पावधीत तो सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. या टिझरमधील स्पेशल इफेक्ट आणि त्याची मांडणी प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली आहे. इतकेच नाही तर चित्रपटाचे बजेट फक्त 12 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच याची तुलना थेट ओम राऊत यांच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाशी केली जात आहे. जे आदिपुरुषला 600 कोटींमध्ये जमू शकले नाही ते हनुमानने केवळ 12 कोटींमध्ये करुन दाखवले असे नेटकरी म्हणत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यापासून यात मुख्य भूमिकेत दिसणार अभिनेता आहे तरी कोण? हे देखील जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत.

चला तर मग प्रभासच्या आदिपुरुषवर भारी पडलेल्या हनुमान चित्रपटातील अभिनेत्याविषयी जाणून घेऊया...

'हनुमान' या तेलुगू चित्रपटात अभिनेता तेजा सज्जा हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

तेजा सज्जा हा तेलुगू चित्रपटसृष्टीचा स्टार आहे. 23 ऑगस्ट 1995 मध्ये हैदराबादमध्ये जन्मलेला तेजा आता तेलंगणात राहतो. त्याचे शालेय शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूल, बेगमपेट येथे झाले.

वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी म्हणजे 1998 मध्ये त्याने बालकलाकार म्हणून त्याच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. त्याने बालकलाकार म्हणून जवळजवळ 50 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

2019 मध्ये त्याने लीड हिरोच्या रुपात करिअर सुरू केले. 'ओह बेबी' हा त्याचा पहिला लीड रोल असलेला चित्रपट आहे. त्यानंतर तो 'इश्क' आणि 'अदभूतम' या चित्रपटांमध्ये दिसला. 'अदभूतम' हा त्याचा पहिला साय फाय रोमँटिक चित्रपट आहे.

2021 मध्ये त्याचा 'झोम्बी रेड्डी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. विशेष म्हणजे हा तेलुगू चित्रपटातील पहिला झोम्बी चित्रपट आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.

आता तेजा 'हनुमान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. टीझरमधील तेजाची बॉडी लँग्वेज जबरदस्त आहे.

'हनुमान' या चित्रपटातून दिग्दर्शक प्रशांत वर्मा हे एक वेगळी युनिव्हर्स साकारणार आहेत. प्रशांत यांनी याआधी ‘awe’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता.

तेजा आणि प्रशांत शर्मा यांचा ‘हनुमान’ हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तामिळ, मल्याळम, आणि कन्नड या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...