आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एक आत्महत्या:तेलुगू टीव्ही अभिनेत्री कोंडापल्ली श्रावणीची आत्महत्या; बॉयफ्रेंड देवराज रेड्डीच्या धमक्यांना कंटाळून उचलले पाऊल - कुटुंबीयांचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रावणीला टीव्ही शो 'मनासु ममता'द्वारे ओळख मिळाली होती.

तेलुगू टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री कोंडापल्ली श्रावणीने आत्महत्या केली आहे. हैदराबाद पोलिसांनी तिच्या तक्रारीवर कारवाई केली नाही तेव्हा श्रावणीने हे टोकाचे पाऊल उचलले असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, टिकटॉकवर भेटलेल्या देवराज रेड्डी नावाच्या व्यक्तीने केलेल्या शोषणाला कंटाळून श्रावणीने आपले जीवन संपवले. हैदराबादच्या मधु नगरस्थित राहत्या घरी 26 वर्षीय श्रावणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. गळवारी रात्री खोली बंद होती

  • मंगळवारी रात्री खोलीचे दार लावून घेतले होते

मंगळवारी श्रावणी तिच्या खोलीत गेली आणि आतून दरवाजा लॉक केला. बराच वेळ बाहेर न आल्याने कुटुंबाला संशय आला आणि त्यांनी दार तोडले. तेव्हा श्रावणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिथे तिला मृत घोषित केले.

  • पोलिसांनी वेगळाच घटनाक्रम सांगितला

बॉयफ्रेंड देवराज रेड्डीकडून सततच्या मिळत असलेल्या धमक्यांना कंटाळून श्रावणीने आत्महत्या केली, असे तिच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. श्रावणीने काही दिवसांपूर्वी पोलिसांत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी देवराज विरोधात कुठलीही कारवाई केली नाही. मात्र पोलिसांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिस अधिकारी नरसिम्हा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावणी आणि देवराजच्या नात्यावर तिचे कुटुंबीय नाखुश होते. यावरुनच मंगळवारी रात्री श्रावणीचा तिच्या आई आणि भावासोबत वाद झाला होता. दरम्यान कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसांची एक टीम आंध्रप्रदेशातील कंकिडा शहरात देवराजला अटक करायला रवाना झाली आहे.

देवराज श्रावणीकडून एक लाख रुपये घेऊन एक आक्षेपार्ह फोटो हटवण्यास तयार झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले. मात्र नंतर त्याने आणखी पैशांची मागणी केली. यामुळे श्रावणी नाराज झाली, त्यानंतर तिने पुन्हा 22 जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, असेही तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. श्रावणीला टीव्ही शो 'मनासु ममता'द्वारे ओळख मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...