आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्याचा अंत:टेनिस चॅम्पियन लिएंडर पेस आणि किम शर्मा यांचे ब्रेकअप?, यावर्षी करणार होते लग्न

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिस चॅम्पियन लिएंडर पेस आणि अभिनेत्री किम शर्मा यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये कमिटमेंटवरुन मतभेद झाले होते. अलीकडेच किम शर्मा अभिनेत्री अलाना पांडेच्या लग्नात एकटी सहभागी झाली होती. याशिवाय 28 मार्च रोजी त्यांच्या रिलेशनशिपच्या दुसऱ्या अ‍ॅनिव्हर्सरीलादेखील किम आणि लिएंडर यांनी एकही सोशल मीडिया पोस्ट टाकली नव्हती. यावरुन दोघांचे मार्ग विभक्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

किम शर्मा आणि अभिनेता डिनो मोरिया अलाना पांडेच्या लग्नात सहभागी झाले होते.
किम शर्मा आणि अभिनेता डिनो मोरिया अलाना पांडेच्या लग्नात सहभागी झाले होते.

2021 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत लिएंडर पेस आणि किम लिएंडर पेस आणि किम शर्मा 2021 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघे अनेकदा जिममध्ये एकत्र वर्कआउट करताना आणि एकत्र डिनर करताना दिसले. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते. 5 सप्टेंबर 2021 रोजी किमने सोशल मीडियावर एक रोमँटिक पोस्ट शेअर करून रिलेशनशिपची अधिकृत माहिती दिली होती.

2022 मध्ये अ‍ॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने केली होती शेवटची पोस्ट
2022 मध्ये किमचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिएंडरने लिहिले होते, "थँक यू फॉर यूवर लव्ह मिच. हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी! मला 365 दिवसांच्या प्रेमळ आठवणी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तू हॅलो म्हणताच माझे मन जिंकले होते."

याचवर्षी लग्न करणार होते किम आणि लिएंडर
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, लिएंडर आणि किम या दोघांनीही त्यांच्या पुर्वीच्या नातेसंबंधांमध्ये वाईट अनुभव आले होते. त्यामुळे दोघेही त्यांच्या भविष्यातील प्लॅन्सबाबत अधिकच सावध आहेत. गेल्या वर्षीच्या बातम्यांनुसार दोघेही यावर्षी कोर्टात लग्न करणार होते.

किमच्या आधी लिएंडर पेस भारतीय मॉडेल रिया पिल्लईसोबत रिलेशनशिपमध्ये होता. लिएंडर आणि रिया यांना एक मुलगीही आहे. तर किम अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत रिलेशनशिपमध्ये होती. किम शर्माने 2000 मध्ये 'मोहब्बतें' चित्रपटातील संजनाच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.